लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीकडील चारही सिंचन प्रकल्पांमध्ये विविध प्रकारची अवैधता आढळून आल्याची माहिती दिली आहे.बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला वाटप करण्यात आलेल्या चार सिंचन प्रकल्पांच्या कंत्राटाविरुद्ध व्यावसायिक अतुल जगताप यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. संबंधित सिंचन प्रकल्पांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्प, अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुकास्थित रायगड नदी सिंचन प्रकल्प, दर्यापूर तालुकास्थित वाघाडी सिंचन प्रकल्प व भातकुली तालुकास्थित निम्न पेढी प्रकल्पाचा समावेश आहे. अमरावती विभागाचे विशेष तपास पथक या चारही प्रकल्पांच्या कंत्राटांची चौकशी करीत असून त्यात अवैधरीत्या सवलत देणे, अवैधरीत्या खर्च वाढवून देणे, आवश्यक प्रमाणपत्रे नसताना कंत्राट देणे इत्यादी अवैधता आढळून आली आहे. या कंपनीने पात्रता नसताना केवळ राजकीय संबंधाच्या बळावर ही कंत्राटे मिळविली असा याचिकाकर्ते जगताप यांचा आरोप आहे. तपास पथक या चार प्रकल्पांसह एकूण २८ सिंचन प्रकल्पांतील घोटाळ्याची चौकशी करीत आहे.
बाजोरिया कन्स्ट्रक्शनकडील चारही सिंचन प्रकल्पांमध्ये अवैधता : 'एसीबी'ची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 22:04 IST
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीकडील चारही सिंचन प्रकल्पांमध्ये विविध प्रकारची अवैधता आढळून आल्याची माहिती दिली आहे.
बाजोरिया कन्स्ट्रक्शनकडील चारही सिंचन प्रकल्पांमध्ये अवैधता : 'एसीबी'ची माहिती
ठळक मुद्दे अमरावती पोलीस अधीक्षकांचे प्रतिज्ञापत्र