‘ड्रेक’च्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे सट्टाबाजारात ‘पॉवरप्ले’; ‘किंग कोहली’च्या संघाकडेच बेटिंग साईट्सचा कल

By योगेश पांडे | Updated: June 4, 2025 00:06 IST2025-06-04T00:06:27+5:302025-06-04T00:06:27+5:30

सामन्यादरम्यान सातत्याने ‘ऑड्स’मध्ये झाले बदल, सामन्याच्या अगोदरपासूनच सट्टाबाजाराचा ‘पीबीकेएस’पेक्षा ‘आरसीबी’कडे जास्त कल होता. श्रे

IPL Betting: 'Drake's' Instagram post creates 'powerplay' in betting market; Betting sites are leaning towards 'King Kohli's' RCBteam | ‘ड्रेक’च्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे सट्टाबाजारात ‘पॉवरप्ले’; ‘किंग कोहली’च्या संघाकडेच बेटिंग साईट्सचा कल

‘ड्रेक’च्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे सट्टाबाजारात ‘पॉवरप्ले’; ‘किंग कोहली’च्या संघाकडेच बेटिंग साईट्सचा कल

योगेश पांडे

नागपूर : २००८ पासून सुरू झालेल्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच माजी कर्णधार व रन मशीन विराट कोहलीला ट्रॉफी उचलण्याची संधी मिळाली. पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजेतेपद मिळाल्याने सट्टाबाजारात बुकींची ‘बल्ले बल्ले’ झाली.

सामन्यादरम्यान सातत्याने ‘ऑड्स’मध्ये बदल होत होते. मात्र दहाव्या षटकानंतर ‘आरसीबी’कडेच सट्टाबाजाराचे आकडे वळले. मात्र दिवसभर चर्चेचा विषय राहिला तो कॅनेडाचा प्रसिद्ध गायक ‘ड्रेक’ याने लावलेली ‘बेटिंग’. त्याने आरसीबीवर तब्बल ६.४ कोटींची बेट लावली होती व याबाबत इन्स्टाग्राम पोस्ट टाकताच ‘आरसीबी’च्या बाजूने सट्टाबाजारात अक्षरश: पॉवरप्ले प्रमाणे बेट्सचा पाऊस पडायला लागला.

सामन्याच्या अगोदरपासूनच सट्टाबाजाराचा ‘पीबीकेएस’पेक्षा ‘आरसीबी’कडे जास्त कल होता. श्रेयस अय्यरपेक्षा सट्टाबाजाराने रजत पाटीदार व विराट कोहलीवर जास्त विश्वास दाखविला होता. ‘आरसीबी’चे ऑड्स १.७५ तर ‘पीबीकेएस’वर १.९० असे ‘ऑड्स’ होते. ‘आरसीबी’ने अपेक्षेनुरुप धावा न केल्याने यात काहीसा बदल झाला होता. मात्र ‘पीबीकेएस’ची सुरुवातदेखील स्फोटक न झाल्याने परत ‘आरसीबी’वरच जास्त लगवाडी-खायवाडी सुरू झाली. ऑनलाईन संकेतस्थळांवरदेखील ‘आरसीबी’च फेव्हरेट होते. अखेर अपेक्षेप्रमाणेच निकाल आल्याने सट्टेबाजांमध्येदेखील कोहलीसाठीच चिअर्स सुरू होते.
कॅनेडियन रॅपर ड्रेकने २०२४ साली कोलकाता नाईट रायडर्सवर बेटिंग केली होती व तो संघ विजयी झाला होता हे विशेष.

Web Title: IPL Betting: 'Drake's' Instagram post creates 'powerplay' in betting market; Betting sites are leaning towards 'King Kohli's' RCBteam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.