शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टेरर फंडिंग तपासापासून पोलीस दूर, एनआयएचा स्थानिक पोलिसांशी संपर्क नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 23:06 IST

नागपूर : टेरर फंडिंग प्रकरणाच्या तपासापासून राष्ट्रीय तपास एजन्सी (एनआयए)ने स्थानिक पोलिसांना दूरच ठेवले आहे.

नागपूर : टेरर फंडिंग प्रकरणाच्या तपासापासून राष्ट्रीय तपास एजन्सी (एनआयए)ने स्थानिक पोलिसांना दूरच ठेवले आहे. तीन दिवस होऊनही या प्रकरणातील नागपूरचा आरोपी जसविंदर सिंह याच्या संबंधाने कोणतीही माहिती एनआयएने स्थानिक पोलिसांना अद्याप विचारली नाही.मात्र, स्थानिक पोलिसांनी स्वत:हूनच या प्रकरणातील आरोपी जसविंदर सिंह याच्या नातेवाईकांवर नजर रोखली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना रोकड पोहोचवणा-या एका टोळीचा छडा एनआयएने लावला. या टोळीतील ९ जणांना एनआयएने ७ नोव्हेंबर रोजी अटक करून त्यांच्याजवळून चलनातून हटविण्यात आलेल्या ३६ कोटी रुपयांच्या नोटा जप्त केल्या. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये नागपूरच्या जसविंदर सिंह याच्यासह मुंबईचा विनोद श्रीधर शेट्टी, दीपक तोपरानी, दिल्लीचा प्रदीप चौहान, भगवान सिंह, अमरोहा (युपी)चे एजाजुल हसन, जम्मू काश्मीरचा मुश्ताक डार, शाहनवाज मीर आणि तमाजिद युसूफ सोफी याचा समावेश आहे.नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी चलनातून बाद झालेल्या नोटा अद्यापही दहशतवाद्यांना पुरविल्या जात असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यामुळे या टोळीवर एनआयएने नजर रोखली होती. टोळीतील सदस्यांच्या हालचालीची नोंद एनआयए करीत होती. मुंबईतील काही हवाला व्यापा-यांद्वारे दिल्लीमार्गे जम्मू काश्मीरमध्ये पैसे पाठवण्यात येत असल्याची माहिती ७ नोव्हेंबरला एनआयएला मिळाली.या आधारावर एनआयएने मुंबई आणि दिल्लीत जाळे टाकून जसविंदर सिंहला त्याच्या साथीदारांसह पकडले. तो नागपूरचा असल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर स्थानिक हवाला व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. त्याच्या घराचा पत्ता मिळाल्यानंतर त्याच्यासंबंधिची माहिती मिळवण्यासाठी नागपुरात छापासत्र सुरू होईल, स्थानिक पोलीस ठिकठिकाणी झाडाझडती घेतील अशी अपेक्षा होती. मात्र, दोन दिवसात असे काहीही झाले नाही. सदर येथील हेमचंद्र अपार्टमेंटमध्ये राहणा-या जसविंदरच्या घराकडे अद्याप तरी अधिकृत रित्या कुणी फिरकले नाही. या संबंधाने स्थानिक वरिष्ठ अधिका-यांना विचारणा केली असता अद्याप आपणाकडे या संबंधाने एनआयए कडून कसलेही निर्देश नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, आम्ही घडामोडींवर सुक्ष्म नजर ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले.जसविंदरचे हवाला कनेक्शनदेशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हवालाचा कारभार चालतो. येथून रोज कोट्यवधी रुपयांचा व्यवहार होतो. स्थानिक पोलिसांना येथील ब-याचशा हवाला व्यावसायिकांची नावे आणि त्यांची दुकानं माहित आहेत, हे विशेष! सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून जसविंदर हवाला व्यापा-याच्या संपर्कात होता. नोटाबंदीनंतर तो फारच अस्वस्थ झाला होता. त्याच्या कुटुंबात पत्नी व दोन मुलं आहेत. पत्नी खासगी शाळेत शिक्षिका आहे. मोठा मुलगा बाहेर नोकरी करतो. तर लहान मुलगा शाळेत शिकतो. काही महिन्यांपूर्वी तो मुंबईत गेला. तेथूनच तो हवालाचा व्यवहार करीत होता. अधून मधून तो नागपुरात यायचा, असेही सांगितले जाते. त्याचे टेरर फंडिंगमध्ये कनेक्शन असल्याचे समोर आल्यानंतर तपास यंत्रणां खडबडून जाग्या झाल्या. एनआयए ही राष्ट्रीय तपास एजन्सी असल्याने जोपर्यंत आदेश मिळत नाही तोपर्यंत स्वत:हून पोलीस संपर्क करू शकत नाही. मात्र, जसविंदरचे स्थानिक हवाला कनेक्शनही आता सुक्ष्मपणे तपासले जात असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने लोकमतशी बोलताना सांगितले.