विदेशातून परतलेल्या नऊ प्रवाशांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 21:49 IST2020-12-24T21:48:45+5:302020-12-24T21:49:07+5:30
Nagpur News विदेशातून परतलेल्या नऊ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली असून सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.

विदेशातून परतलेल्या नऊ प्रवाशांची तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: विदेशातून परतलेल्या नऊ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली असून सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्वांनी महानगरपालिकेकडे ‘सेल्फ डिक्लेरेशन’ दिले आहे. यातील फ्रान्सवरुन आलेल्या एका प्रवाशाला खासगी हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. उर्वरित ८ प्रवाशांमध्ये १ कोरिया, २ जपान तर ५ प्रवासी अमेरिका येथून परतले आहेत. मागील तीन आठवड्यात विदेशवारी करून नागपुरात परतलेल्या ३० ते ४० प्रवाशांशी संपर्क साधला जात आहे.