आमदार गोरंट्याला यांची चौकशी करा, नितेश राणे यांची मागणी
By मंगेश व्यवहारे | Updated: December 18, 2023 16:21 IST2023-12-18T16:20:00+5:302023-12-18T16:21:16+5:30
बॉम्बस्फोटामध्ये मेलेले कुणाच्या पक्षाचे नाहीत. यात राजकारण व्हायला नको. चौकशी व्हायला हवी. काँग्रेसच्या आमदारांनी हा विषय सभागृहात मांडावा, असं देखील नितेश राणे म्हणाले.

आमदार गोरंट्याला यांची चौकशी करा, नितेश राणे यांची मागणी
नागपूर : १९९३च्या बॉम्बस्फोटातील मुख्य सुत्रधार दाउद इब्राहिमचा राइट हॅण्ड असलेला सलीम कुत्ता याची हत्या झाल्याची माहिती जालनाचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना कशी माहिती, असा सवाल करत आमदार गोरंट्याला यांची चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
बॉम्बस्फोटामध्ये मेलेले कुणाच्या पक्षाचे नाहीत. यात राजकारण व्हायला नको. चौकशी व्हायला हवी. काँग्रेसच्या आमदारांनी हा विषय सभागृहात मांडावा, असेदेखील नितेश राणे म्हणाले.
मालेगावात हवे आयुक्तालय
मालेगावचे पाकिस्तान बनविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहे. हिंदूंना कमी करून अल्पसंख्यकांची संख्या वाढविण्यावर भर आहे. तिथे नवीन पोलिस आयुक्तालय तयार करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे आमदार नितेश राणे म्हणाले.