शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

नागपूरच्या मेडिकलमध्ये कोविडसाठी हजार खाटा करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 10:01 AM

नागपूरच्या मेडिकलमध्ये १७०० खाटा असताना कोविड रुग्णांसाठी केवळ ६०० खाटा उपलब्ध असणे योग्य नाही, यात आणखी ४०० खाटांची भर टाकून हजार खाटा करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

ठळक मुद्देप्रोत्साहनाऐवजी काहीच करीत नसल्याचा ठेवला ठपका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलमध्ये १७०० खाटा असताना कोविड रुग्णांसाठी केवळ ६०० खाटा उपलब्ध असणे योग्य नाही, यात आणखी ४०० खाटांची भर टाकून हजार खाटा करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. विशेष म्हणजे, गेल्या सात महिन्यांपासून मेडिकलमधील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी जीवावर उदार होऊन रात्रंदिवस कोविड रुग्णांना सेवा देत आहेत. परंतु बैठकीत त्यांच्या कार्याचे कौतुक न करता मेडिकलमध्ये काहीच काम होत नसल्याचा ठपकाही त्यांनी ठेवल्याचे सूत्राने सांगितले.

कोविड रुग्णांचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री टोपे यांनी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता मेडिकलमध्ये बैठक घेतली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी आ. प्रकाश गजभिये, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कु मार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा आदी उपस्थित होते. प्राप्त माहितीनुसार, आरोग्यमंत्री टोपे यांनी आढावा बैठकीत सुरुवातीपासून मेडिकलमध्ये कोविडबाबत योग्य पद्धतीने काम होत नसल्याचा सूर आळवला. मुंबईमधील रुग्णसेवेची त्यांनी उदाहरणे दिली. शेवटी आहे त्या मनुष्यबळात कोरोनाबाधित रुग्णांसाठी तातडीने खाटा वाढविण्याच्या सूचना दिल्याचे समजते.प्रशासनाच्या चुकांचे खापर मेडिकलच्या माथीकोरोनाच्या सात महिन्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जम्बो कोविड हॉस्पिटल, मनपाचे कोविड हेल्थ सेंटर याच्या केवळ घोषणा केल्या, परंतु प्रत्यक्षात काहीच झाले नाही. आरोग्य विभाग केवळ आकडेवारी जमा करण्यापुरताच मर्यादित आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये सोयी उभ्या करण्यास प्रशासनाला हवे ते यश आले नाही. यामुळे आपल्या चुकांचे खापर आढावा बैठकीत मेडिकलच्या माथी मारल्याची चर्चा  दिवसभर मेडिकलमध्ये होती.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपे