पदाधिकाऱ्यांद्वारे लसीकरण केंद्राची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:08 IST2021-04-10T04:08:50+5:302021-04-10T04:08:50+5:30
काेंढाळी : काटाेल तालुक्यात काेराेना संक्रमण वाढत असताना काेराेना लसीकरणाला गती देण्यासाठी पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्रांला ...

पदाधिकाऱ्यांद्वारे लसीकरण केंद्राची पाहणी
काेंढाळी : काटाेल तालुक्यात काेराेना संक्रमण वाढत असताना काेराेना लसीकरणाला गती देण्यासाठी पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्रांला भेटी देत पाहणी केली आणि कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना मनात भीती न बाळगत लसीकरण करवून घ्यावे, असे आवाहनही या पदाधिकाऱ्यांनी केले.
या पदाधिकाऱ्यांनी पहिल्या टप्प्यात काटाेल तालुक्यातील कोंढाळी, कचारीसावंगा, रिधोरा व मेंढेपठार (बाजार) येथील काेराेना लसीकरण केंद्रांना भेटी दिल्या. यात त्यांनी लसींचा साठा, नागरिकांची हाेणारी गैरसाेय व इतर बाबींसंदर्भात वैद्यकीय अधिकारी, आराेग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक परिचालक व आशा सेविकांशीही चर्चा करून माहिती व समस्या जाणून घेतल्या. या पथकात पंचायत समिती उपसभापती अनुराधा खराडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, पंचायत समिती सदस्य संजय डांगोरे व लता धारपुरे, खंडविकास अधिकारी संजय पाटील, जयंत टालाटुले, मेंढेपठार (बाजार)च्या सरपंच दुर्गा चिखले, प्रवीण थोटे, विजय डहाट, सतीश कापसे यांचा समावेश हाेता.