नागपुरात बस तपासणीत १० कंडक्टर बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 01:27 IST2020-03-16T22:58:29+5:302020-03-17T01:27:39+5:30
आपली बसमधील तिकीट चोरीला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांच्या निर्देशानुसार भरारी पथकाने सोमवारी शहर बस तपासणी मोहीम राबवून रॅकेटमधील सहभागी १० कंडक्टरना बडतर्फ केले.

नागपुरात बस तपासणीत १० कंडक्टर बडतर्फ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपली बसमधील तिकीट चोरीला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांच्या निर्देशानुसार भरारी पथकाने सोमवारी शहर बस तपासणी मोहीम राबवून रॅकेटमधील सहभागी १० कंडक्टरना बडतर्फ केले.
सकाळी पथकाला बस क्र.६१४४ चा कं डक्टर सेटअप चालवित असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या बसच्या पाळतीवर पथक होते. बाबुळखेडा ते बर्डी या मार्गावर चालणारी ही बस नांदा फाटा पुलाच्या खाली अचानक थांबविण्यात आली. यावेळी बस तपासणीत बसचा चालक सचिन कापसे हा मोबाईल लपवित असल्याचे निदर्शनास आले. त्याचा मोबाईल जप्त केला असता त्यावर अनेक कंडक्टरचे फोन येत होते. या मोबाईलवरून तिकीट चेकरची माहिती दिली जात असल्याचे आढळून आले. या ग्रुपवरील सर्व कंडक्टर यात सहभागी असल्याचे निदर्शनास आल्याने बोरकर यांच्या निर्देशानुसार १०जणांना बडतर्फ करण्यात आले. यात अंकुश राठोड, विलास भोंडेकर, सुधीर गणोरकर, सरफराज ,दिनेश लांडगे , संजय चोंडे , राहुल बागडे , मोहन सोनकुसरे, राकेश मेश्राम आदींचा समावेश आहे. हे सर्व सचिन कापसे याच्या वाहक सेटअप वर संलग्न असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
तपासणी पथकात पथक प्रमुख सुनील शुक्ला, किशोर वावुरकर, अरुण मेंढे, गिरीश महाजन, गौरव मेश्राम आदींचा समावेश होता. सचिन कापसे याच्या जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये वारंवार एकानंतर एक असे वाहकांचे कॉल येत असल्याचे निदर्शनास आले.