तूर, हरभरा पिकांवर किडीचे प्रमाण वाढीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:21 IST2021-01-08T04:21:55+5:302021-01-08T04:21:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर विभागातील तूर पिकावर हेलिकोवर्पा, पाने गुंडाळणारी अळी, शेंग माशी तसेच हरभरा पिकांवरील ...

तूर, हरभरा पिकांवर किडीचे प्रमाण वाढीस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर विभागातील तूर पिकावर हेलिकोवर्पा, पाने गुंडाळणारी अळी, शेंग माशी तसेच हरभरा पिकांवरील घाटेअळी आणि मर रोगाचे प्रमाण वाढले आहे. या किडीवर शेतकऱ्यांनी वेळीच कीटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
विदर्भात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. अशावेळी तूर आणि हरभरा पिकांवर मोठ्या प्रमाणावर तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळ्या आणि हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
तूर पिकांवरील कीड नियंत्रणासाठी ५० मीटर अंतरावर पाच कामगंध सापळे उभारावेत. एच.ए.एन.पी.व्ही, इमामकटीन बेंझोएट, क्लोरानटानिलीप्रॉल, पिसारी किडीसाठी फ्लूबेंडामाइड किंवा इंडोक्साकार्ब या कीटकनाशकाची फवारणी करावी. तुरीच्या शेंगांमध्ये अळी आढळून आल्यास शेतकऱ्यांनी क्विनॉलफॉस, लॅम्ब्डा सायहालोथ्रिन आणि लुफेन्यूरॉनची फवारणी करावी. तर हरभरा पिकावर घाटेअळीचे प्रमाण वाढल्यास फ्लूबेंडामाइड, क्विनॉलफॉस, टायझोफॉस, डेल्टामेथ्रीनची दोन वेळा फवारणी करावी, अशी सूचना कृषी विभागातर्फे करण्यात आली आहे.