भारतात उद्योजकांसाठी असंख्य संधी

By Admin | Updated: August 9, 2015 02:41 IST2015-08-09T02:41:14+5:302015-08-09T02:41:14+5:30

विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी(व्हीएनआयटी) च्या व्हीएनआयटी अ‍ॅल्युम्नी असोसिएशनतर्फे ..

Innovative opportunities for entrepreneurs in India | भारतात उद्योजकांसाठी असंख्य संधी

भारतात उद्योजकांसाठी असंख्य संधी

राजन जसवा : व्हीएनआयटीत उद्योजकता अभ्यासक्रमाचे उद्घाटन
नागपूर : विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी(व्हीएनआयटी) च्या व्हीएनआयटी अ‍ॅल्युम्नी असोसिएशनतर्फे यावर्षीपासून उद्योजकता अभ्यासक्रमाला (इन्ट्रोडक्शन आॅफ एन्टरप्रिनरशीप) सुरुवात करण्यात आली असून उद्योग जगतातील मान्यवरांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात या नवीन अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
अभ्यासक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी सिलिकॉन व्हॅलीतील उद्योजक राजन जसवा, व्हीएनआयटी बोर्ड आॅफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष विश्राम जामदार, व्हीएनआयटीचे संचालक डॉ. एन.एस. चौधरी, व्हीएनआयटी अ‍ॅल्युम्नी असोसिएशनचे चेअरमन शशी चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. उद्योजकता अभ्यासक्रम हे व्हीएनआयटी अ‍ॅल्युम्नी असोसिएशनचे मूल आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मुंबई आयआयटीमध्ये याच अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वर्षभरापासून शिकविणारे राजन जसवा यांनी व व्हीएनआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी मिळून हा अभ्यासक्रम तयार केला आहे. यावेळी बोलतांना राजन जसवा म्हणाले, भारतात नवे उद्योग सुरू करण्याच्या असंख्य संधी आहेत. इतर आयआयटीयन्समध्ये या अभ्यासक्रमाबाबत उत्सुकता आहे. पहिले वर्ष असल्याने केवळ ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून यातील १० टक्के तरी उद्योग स्थापन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विश्राम जामदार यांनी व्हीएनआयटी अ‍ॅल्युम्नी असोसिएशनने एक चांगली सुरुवात केली असून आपल्याला विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली तर व्हीएनआयटीचे संचालक डॉ. एन.एस. चौधरी यांनी अभ्यासक्रमाच्या यशस्वीतेसाठी हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक करताना शशी चौधरी म्हणाले, आजचा काळ हा टेक्नॉलॉजीपूरक उद्योजकांचा काळ आहे. त्यामुळे काळानुसार कुशल उद्योजकांची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. व्हीएनआयटीतील या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना राजन जसवा यांच्यासह देशातील अग्रगण्य उद्योजकांचे मार्गदर्शन लाभणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाला व्हीएनआयटी अ‍ॅल्युम्नी असोसिएशनचे अध्यक्ष उदय कामत, जोगींदरसिंग सोंद, अशोक अगरवाल, दिलीप कामदार, प्रमोद पाम्पटवार, डॉ. अरविंद कुमार पाटील, सुनील सिर्सिकर, पंकज भाविषी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुनील भट यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. राघवेंद्र देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी अनिल ठक्कर व अभिजित हरदास यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Innovative opportunities for entrepreneurs in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.