शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

नागपूरसह राज्यात सहा ठिकाणी ‘इनोव्हेशन हब’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2022 20:16 IST

Nagpur News राज्य कौशल्य विद्यापीठाच्यावतीने नागपुरात हेल्थकेअर, सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक याचे इनोव्हेशन हब तयार करण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देकौशल्य विद्यापीठाचे नागपुरातील उपकेंद्र जुलैपासून

नागपूर : राज्य कौशल्य विद्यापीठाच्यावतीने नागपुरात हेल्थकेअर, सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक याचे इनोव्हेशन हब तयार करण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. नागपूरसह राज्यात सहा ठिकाणी असे इनोव्हेशन हब तयार केले जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले की, कौशल्य विद्यापीठ हे मुंबईत आहे. यासोबतच नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक, कोल्हापूर आदींसह १३ ठिकाणी उपकेंद्र सुरू करण्यात येत आहे. नागपुरातील विभागीय उपकेंद्र हे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात राहणार असून येत्या जुलै-ऑगस्टपासून त्याला सुरुवात होईल. केंद्रात पहिल्या टप्प्यात आयओटी सायबर सिक्युरिटी अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहे. या सर्व अभ्यासक्रमांना अभियांत्रिकीचा दर्जा (बी.टेक. व एम.टेक) राहील. उद्योगांच्या मागणीनुसार रोजगारक्षम शिक्षण देऊन आवश्यक मनुष्यबळ निर्मितीसाठी कौशल्य विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग सायबर सिक्युरिटी, बिझनेस इंटेलिजन्स, इनोव्हेशन रोबोटिक्स अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच मीडिया कम्युनिकेशन, ह्यूमॅनिटी आदी अभ्यासक्रमात सुरू केले जातील. चाळीस टक्के अभ्यास वर्ग आणि साठ टक्के ऑन द जॉब ट्रेनिंग देण्यात येईल.

यावेळी सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अनंत सोनकुवर उपसंचालक मोटघरे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य प्रमोद ठाकरे, उपप्रचार्य चांदेकर, पंडिले उपस्थित हाेते.

- राज्यात २०० कौशल्य सेंटर उभारणार

कौशल्य विद्यापीठाचे विविध सेंटर उभारण्यात येणार आहे. राज्यात जवळपास २०० कौशल्य सेंटर उभारण्यात येतील. जास्तीत जा स्त महाविद्यालयांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे डॉ. पालकर आवाहनही त्यांनी यावेळी केले.

-उद्योजकांशी चर्चा करून अभ्यासक्रम

कौशल्य विद्यापीठाचे उपकेंद्र तयार करताना उद्योजकांशी चर्चा केली जाणार आहे. त्यांना आवश्यक असलेले मनुष्यबळ व तंत्रज्ञान यातून अभ्यासक्रम निर्माण केले जाते. यात विविध अभ्यासक्रम असणार असून, यामुळे सदर अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार व शिक्षणाची सोय असणार असल्याचे डॉ. पालकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र