संत्रा पिकावर रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव; फळांची १० ते ४० टक्क्यांपर्यंत होते गळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 12:10 AM2019-10-29T00:10:44+5:302019-10-29T00:11:18+5:30

संत्रा उत्पादकाचे होऊ शकते नुकसान

Influence of pest sucking juice on orange crop; Fruit grows from 3 to 4 percent of the fruit | संत्रा पिकावर रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव; फळांची १० ते ४० टक्क्यांपर्यंत होते गळ

संत्रा पिकावर रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव; फळांची १० ते ४० टक्क्यांपर्यंत होते गळ

Next

नागपूर : संत्रा पिकावर रस शोषण करणाºया किडीचा प्रादुर्भाव केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या (एनआरसीसी) निष्कर्षास आला आहे. या किडीमुळे १० ते ४० टक्क्यांपर्र्यंत तोडणीला आलेल्या संत्राफळाची गळ होत असल्याने, संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

संत्रा फळाचा रस शोषण करणारी ही कीड फळ पिकांसाठी गंभीर कीड (पतंग) आहे. रात्रीच्या वेळी पतंग फळाचे रस शोषण करते. त्यामुळे अपरिपक्व संत्रापिकाची गळ होते, फळे सडतात. भारतामध्ये संत्रा पिकावर येणाºया किडीच्या अनेक प्रजातीची नोंद करण्यात येते. त्यात यूडोसीमा प्रजाती ही सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात फळ गळतीसाठी कारणीभूत ठरते. ही कीड संत्रा पिकावर रात्रीला अटॅक करते. फळांना छिद्र करून रस शोषण करते. पक्व झालेली अपरिपक्व फळे पिकण्याच्या आधीच गळून खाली पडतात. खाली पडलेल्या फलांवर बुरशीच्या प्रादुर्भावाने फळे सडतात. फ ळे पिकण्याच्या वेळेस या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. सडलेल्या फळांना चांगल्या फळांसोबत पॅकिंग केले असता, रोगजनक संक्रमणाच्या माध्यमातून गंभीर धोका निर्माण होऊ शकतो व चांगली फळे सडतात, अशी माहिती एनआरसीसीचे संचालक एम.एस. लदानिया यांनी दिली.

किडीवर असे मिळविता येईल नियंत्रण खाली पडलेली फळे गोळा करून जमिनीमध्ये खड्डा कडून गाडून द्यावी. कीड दूर करण्यासाठी सायंकाळी बगीच्यात धूर करावा. पावसाळ्यात बगीच्यासभोवताल आलेल्या वेली, वनस्पती, रोपटी नष्ट करावीत. पसरट भांड्यामध्ये औषध तयार करून झाडाला अटकवावे. कीड नियंत्रणासाठी उपलब्ध असलेली पिशवी झाडाला लटकवावी. कीटकनाशकाची फवारणी करावी.

Web Title: Influence of pest sucking juice on orange crop; Fruit grows from 3 to 4 percent of the fruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.