तुरीवर अळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:27 IST2020-12-15T04:27:38+5:302020-12-15T04:27:38+5:30
खापा : चार दिवसांपासून तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकाची अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अळ्या माेठ्या प्रमणात शेंगा पाेखरून ...

तुरीवर अळीचा प्रादुर्भाव
खापा : चार दिवसांपासून तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकाची अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अळ्या माेठ्या प्रमणात शेंगा पाेखरून फस्त करीत असल्याने तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी फवारणी करणे आवश्यक असल्याची माहिती कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली.
खापा (ता. सावनेर) परिसरात बहुतांश शेतकरी कपाशीसाेबत तुरीचे मिश्र पीक घेतात. अति पाऊस, प्रतिकूल हवामान, बुरशीजन्य राेग व किडींच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील साेयाबीनचे पीक नष्ट झाले तर कपाशीचे पीक बाेंडसड व गुलाबी बाेंअळीचा उद्ध्वस्त झाले. त्यामुळे तुरीचे पीक शेतकऱ्यांसाठी आशेचे किरण ठरले. त्यातच काही शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणीही केली.
चार दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तुरीसह हरभऱ्याच्या पिकावर अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. अळ्यांनी तुरीच्या शेंगा व हरभऱ्याच्या घाट्यांसह पाने फस्त करायला सुरुवात केली आहे. या अळींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्याची सूचना कृषी विभागाने केली असून, त्यामुळे या दाेन्ही पिकांचा उत्पादनखर्च वाढण्याची व उत्पादन घटण्याची शक्यता बळावली आहे. दुसरीकडे, साेयाबीनचे पीक नष्ट झाल्याने यावर्षी उन्हाळ्यात गुरांना चाराटंचाईला सामाेरे जावे लागण्याची शक्यताही काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.