कुख्यात गुंड शेखूची प्रेमिका लागली हाती  : दोन साथीदारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:28 IST2019-10-05T00:28:00+5:302019-10-05T00:28:33+5:30

कुख्यात गुंड शेखूच्या प्रेमिकेसह तीन साथीदार पोलिसांच्या हाती लागले आहेत. प्रेमिकेने पोलीस आल्याची सूचना दिल्यामुळे शेखू साथीदारांसह फरार झाला.

Infamous hooligan sheikhu's girlfriend caught up with: two accomplices arrested | कुख्यात गुंड शेखूची प्रेमिका लागली हाती  : दोन साथीदारांना अटक

कुख्यात गुंड शेखूची प्रेमिका लागली हाती  : दोन साथीदारांना अटक

ठळक मुद्देमनीषनगरात केली कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कुख्यात गुंड शेखूच्या प्रेमिकेसह तीन साथीदार पोलिसांच्या हाती लागले आहेत. प्रेमिकेने पोलीस आल्याची सूचना दिल्यामुळे शेखू साथीदारांसह फरार झाला. शेखूच्या साथीदारांकडून पिस्तुल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेले आरोपी स्नेहल सुधीर पीटर, शिवा ऊर्फ शिवप्रसाद मुरलीधर बेजनकिवार आणि आकाश उत्तम चव्हाण आहेत.
शेख खुनाचा प्रयत्न तसेच हप्ता वसुलीच्या प्रकरणात पोलिसांना दोन महिन्यांपासून हवा होता. गुन्हे शाखेचे पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांना तो मनीषनगरच्या जयदुर्गा सोसायटीत प्रेमिका आणि साथीदारांसह राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शुक्रवारी सकाळी त्याच्या फ्लॅटवर धाड टाकली. शेखूने कुत्रे पाळले होते. पोलिसांना पाहून कुत्रे भुंकत होते. त्यांनी पोलिसांच्या मार्गात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी भिंत ओलांडून अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. हे पाहून स्नेहलने शेखूला पोलीस आल्याची माहिती दिली. शेखू सूरज नावाच्या मित्रासोबत बाहेर गेला होता. तो फरार झाला. पोलिसांना फ्लॅटमध्ये स्नेहलसोबत शिवा आणि आकाश जाधव भेटले. पोलिसांनी अटक करताच स्नेहलने हंगामा केला. तिने कारवाईला विरोध केला. सूत्रांनुसार शेख काही दिवसांपासून येथे राहण्यास आला. त्याने नीलेश अग्रवाल नावाच्या व्यक्तीचा फ्लॅट किरायाने घेतला. स्नेहल अनेक दिवसापासून शेखूसोबत आहे. ती पूर्वीपासून चर्चेत आहे. शेखू भाजपा युवा मोर्चाचे तत्कालीन उपाध्यक्ष हेमंत दियेवारच्या खुनापासून चर्चेत आला. त्याने तीन वर्षांपूर्वी बजाजनगरच्या एका फ्लॅटवर ताबा घेतला होता. शेखूची पश्चिम नागपुरातही दहशत आहे. तो कोळसा आणि दारूच्या तस्करीतील मोठा गुन्हेगार आहे. त्याच्या गुन्ह्यांमुळे त्याच्या विरुद्ध मकोकाची कारवाई करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Infamous hooligan sheikhu's girlfriend caught up with: two accomplices arrested