शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

उद्योगांना विजेची अडचण जाणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 23:37 IST

विदर्भ व मराठवाडा येथील उद्योगांना मुबलक वीज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नियोजन आणि बंद उद्योग सुरू करण्याला सरकार प्रोत्साहन देत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

ठळक मुद्देव्हीआयएतर्फे पालकमंत्र्यांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ व मराठवाडा येथील उद्योगांना मुबलक वीज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नियोजन आणि बंद उद्योग सुरू करण्याला सरकार प्रोत्साहन देत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.नागपूर व अमरावती विभागातील सर्व केंद्र एकमेकांना जोडणारा महत्त्वाकांक्षी ट्रान्समिशन रिंगमेन तयार करण्यात येत आहे. त्यासाठी २५० कोटी रुपये खर्च येणार आहे. शेतकऱ्यांना सौरऊर्जा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.उद्योग भवन, सिव्हील लाईन्स येथील व्हीआयए सभागृहात शनिवारी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन, विदर्भ प्लास्टिक इंडस्ट्रीज असोसिएशन, नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, लघु उद्योग भारती, विदर्भ डिस्पोजेबल अ‍ॅण्ड ट्रेडर्स असोसिएशन, पॅकेज ड्रिकिंग वॉटर असोसिएशन, नागपूर हॉटेल ओनर्स असोसिएशन, डिक्की विदर्भ चॅप्टर, कळमेश्वर इंडस्ट्रीज एमआयडीसी असोसिएशन, नागपूर होलसेल होजिअरी अ‍ॅण्ड रेडिमेड गारमेंट मर्चंट असोसिएशन, होलसेल क्लॉथ मर्चंट्स असोसिएशन, व्हीआयए महिला विंग, महिला गृहउद्योग आदी संघटनांतर्फे बावनकुळे यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला.व्यासपीठावर व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, सचिव सुहास बुद्धे, एमआयएचे अध्यक्ष कॅ. सी.एम. रणधीर, बीएमचे सचिव सीए मिलिंद कानडे, चंद्रपूर इंडस्ट्रीज असो.चे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, विदर्भ प्लास्टिक असो.चे माजी अध्यक्ष श्रीकांत धोर्डीकर आणि रमेश मंत्री उपस्थित होते.बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक असलेली तीन हजार मेगावॅट विजेची मागणी सौर उर्जेवर आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. येत्या २०२२ पर्यंत संपूर्ण कृषी पंप सौरऊर्जेवर आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सोलर कृषी फिडर योजना सुरू करण्यात आली आहे. राज्याची ही योजना संपूर्ण देशात राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. विदर्भ व मराठवाड्यातील बंद उद्योग अ‍ॅमिनिटी योजनेंतर्गत सुरू करण्याला प्रोत्साहन देण्यात येत असून यासाठी योजना जाहीर करण्यात येईल. औद्योगिक विकास महामंडळाच्या उद्योगक्षेत्रातील सार्वजनिक उपयोगाच्या जमिनी अथवा जेथे अद्याप उद्योग सुरू होऊ शकले नाहीत,अशा जागांवर सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात येईल. त्यामुळे उद्योजकांना मागणीपेक्षाही जास्त वीज उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कोराडी येथील महालक्ष्मी मंदिराचा विकास करताना वृद्धाश्रम, अनाथालय, ध्यान साधना केंद्र, अपंग पुर्नवसन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक आहे. यावेळी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे