महाराष्ट्रात औद्योगिक वीजदरात कपात! आता देशात सर्वात स्वस्त वीज मिळणार

By शुभांगी काळमेघ | Updated: July 16, 2025 20:25 IST2025-07-16T20:24:12+5:302025-07-16T20:25:03+5:30

Nagpur : घरगुती वीजदरातही दिलासा! ७०% ग्राहकांना २६% सवलत मिळणार

Industrial electricity rates reduced in Maharashtra! Now you will get the cheapest electricity in the country | महाराष्ट्रात औद्योगिक वीजदरात कपात! आता देशात सर्वात स्वस्त वीज मिळणार

Industrial electricity rates reduced in Maharashtra! Now you will get the cheapest electricity in the country

नागपूर : महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर लवकरच देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी असतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. सध्या महाराष्ट्रात औद्योगिक वीजदर ८.३२ रुपये प्रति युनिट आहे. तो पुढील टप्प्यात ७.३८ रुपयांवर आणला जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. 


काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देत असतांना फडणवीसांनी सांगितले की, राज्य सरकार वीज 'मेरिट ऑर्डर डिस्पॅच' प्रणालीद्वारे खरेदी करणार आहे. यामुळे खासगी कंपन्यांकडून स्वस्त दराने वीज खरेदी करता येईल.


सौर आणि पवन ऊर्जा, तसेच बॅटरी स्टोरेजचा वाढता वापर पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करत आहे. परिणामी, वीजदरात स्थैर्य येणार असून पुढील २५ वर्षांसाठी दर स्थिर राहतील, असेही त्यांनी नमूद केले.


फडणवीस म्हणाले की, व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी सर्वच स्तरांवरील वीज दरात कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यातील ७० टक्क्यांहून अधिक ग्राहक दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरतात. या ग्राहकांना २६ टक्के दरसवलत मिळणार असून, जास्त वापर करणाऱ्या ग्राहकांनासुद्धा दिलासा मिळेल.


शेतकऱ्यांच्या हितासाठी सौर पंप योजनांमध्येही बदल करण्यात येत आहे. नवीन 'सिंगल पोल योजना' अंतर्गत शेतकऱ्यांना केवळ १५,००० रुपयांत सौरपंप उपलब्ध करून दिला जाणार आहे. गरज भासल्यास १० अश्वशक्तीचे बूस्टर पंपही देण्यात येणार आहेत. 


वीज चोरी आणि गैरवापर रोखण्यासाठी राज्यात स्मार्ट मीटर बसवले जात असून, यामुळे भविष्यातील वीज नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल. तसेच, उपसा सिंचन प्रकल्पांसाठी स्वतंत्र सौरऊर्जा प्रस्ताव तयार असून, त्याचा वापर मुख्यतः अंधार असलेल्या भागात केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: Industrial electricity rates reduced in Maharashtra! Now you will get the cheapest electricity in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.