शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

औद्योगिक विकासाची मानसिकता उद्योजकांमध्ये असावी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:26 IST

छोट्या छोट्या उद्योगातून विदर्भ आणि मराठवाड्याचा औद्योगिक विकासाचा शासनाचा प्रयत्न आहे. भौगोलिक परिस्थिती, पायाभूत सुविधा, बाजारपेठांसह उद्योजकांमध्ये औद्योगिक विकासाची मानसिकता असणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्दे सुधीर मुनगंटीवार : व्हीआयए, बीएमए, एमआयएतर्फे सत्कार

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छोट्या छोट्या उद्योगातून विदर्भ आणि मराठवाड्याचा औद्योगिक विकासाचा शासनाचा प्रयत्न आहे. भौगोलिक परिस्थिती, पायाभूत सुविधा, बाजारपेठांसह उद्योजकांमध्ये औद्योगिक विकासाची मानसिकता असणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए), बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (बीएमए) आणि एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या(एमआयए)वतीने सिव्हिल लाईन्स येथील उद्योग भवनातील व्हीआयएच्या सभागृहात बुधवारी सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर व्हीआयए अध्यक्ष अतुल पांडे, बीएमए अध्यक्ष नितीन लोणकर, एमआयए अध्यक्ष कॅ. सी.एम. रणधीर, व्हीआयएचे माजी अध्यक्ष प्रवीण तापडिया, सचिव डॉ. सुहास बुद्धे उपस्थित होते.मुनगंटीवार म्हणाले, विदर्भ व मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात उद्योग येण्यासाठी शासन संवेदनशील आहे. विदर्भाने औद्योगिक विकास करावा, अशी मुख्यमंत्री व नितीन गडकरी यांची इच्छा आहे. फ्लाय अ‍ॅश व बांबूचे काही करता येईल का, याचा विचार सुरू आहे. विदर्भात खनिज संपदा मुबलक आहे. त्यापासून महसूल कसा गोळा होईल, यावर अभ्यास करण्याची गरज आहे. अगरबत्तीची काडी जर चीनमधून आणावी लागत असेल तर भारत माता की जय हळू आवाजात म्हणा, असा टोला त्यांनी लगावला. सर्व विभागाच्या समस्या पाठवा आणि त्या बैठका घेऊन सोडवू, असे आश्वासन त्यांनी व्हीआयए पदाधिकाऱ्यांना दिले.प्रारंभी अतुल पांडे यांनी जीएसटीचा मुद्दा उपस्थित केला आणि वीज दरावर मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले. रणधीर यांनी हिंगणा एमआयडीसीमध्ये मोठे आॅटोमोबाईल उद्योग आणण्याची मागणी केली. नितीन लोणकर उद्योगांसाठी झुडपी जंगलाच्या जमिनीचा विचार करावा तसेच उद्योगांना बँकांकडून कर्ज मिळत नसल्याचे सांगितले. बुटीबोरी औद्योगिक भागात ५० हजार झाडे लावण्यात येत असल्याचे ते म्हणाले.संचालन डॉ. सुहास बुद्धे यांनी केले. याप्रसंगी डिक्कीचे मध्य भारताचे अध्यक्ष निश्चय शेळके, विदर्भ प्रमुख गोपाल वासनिक, आयसीएआयचे माजी अध्यक्ष अशोक चांडक, व्हीआयएचे पदाधिकारी पंकज बक्षी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारnagpurनागपूर