शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

विदर्भ-मराठवाड्यातील औद्योगिक ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा मिळणार : संजीव कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 10:21 PM

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक ग्राहकांसोबत थेट संवाद साधला. याप्रसंगी औद्योगिक ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याची ग्वाही संजीव कुमार यांनी दिली. वीजखरेदी किंमत कमी केल्याबद्दल यावेळी औद्योगिक ग्राहकांच्यावतीने संजीव कुमार यांचे अभिनंदन करण्यात आले.

ठळक मुद्देऔद्योगिक ग्राहकांशी साधला थेट संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक ग्राहकांसोबत थेट संवाद साधला. याप्रसंगी औद्योगिक ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याची ग्वाही संजीव कुमार यांनी दिली. वीजखरेदी किंमत कमी केल्याबद्दल यावेळी औद्योगिक ग्राहकांच्यावतीने संजीव कुमार यांचे अभिनंदन करण्यात आले.महावितरणकडून औद्योगिक ग्राहकांना नेहमीच उत्कृष्ट सेवा देण्यात येते. तसेच या सेवेचा दर्जा उंचाविण्यासाठी महावितरणकडून नेहमीच प्रयत्न करण्यात येतात, असे स्पष्ट करून औद्योगिक ग्राहकांनी नवीन वीजजोडणीचा अर्ज आॅनलाईनद्वारेच करावा, असे आवाहन संजीव कुमार यांनी यावेळी केले. औद्योगिक ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी देखभाल व दुरुस्तीची कामे अधिक नियोजनबद्धपणे व सातत्याने करावी. वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात तसेच प्रादेशिक संचालकांनी औद्योगिक ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्यासोबत प्रत्येक महिन्यात बैठकीद्वारे संवाद साधावा, असे निर्देशही संजीव कुमार यांनी दिले. यावेळी औद्योगिक ग्राहकांतर्फे करण्यात आलेल्या विविध सूचनांची दखल घेण्यात येईल, असे संजीव कुमार यांनी सांगितले.विदर्भ प्रादेशिक विभागामधील नागपूर, बुटीबोरी, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, अकोला, खामगाव, मूर्तिजापूर, मूल इत्यादी तसेच मराठवाडा प्रादेशिक विभागामधील औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, धुळे आणि बीड इत्यादी औद्योगिक ग्राहक प्रतिनिधींनी या संवादात सहभाग नोंदविला. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या थेट संवादात संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू, संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Vidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडाconsumerग्राहक