शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

इंदोरा मेट्रो स्टेशनची डेडलाईन संपली, ऑगस्टमध्ये खुले होणार

By मोरेश्वर मानापुरे | Updated: July 16, 2024 18:54 IST

‘सीएमआरएस’ तपासणी लवकरच : प्रवाशांच्या अडचणी वाढल्या

मोरेश्वर मानापुरे

नागपूर : नागपूरमेट्रो रेल्वेचे अखेरचे ३८ वे इंदोरा स्टेशन ३० जूनपर्यंत सुरू होणार असल्याची घोषणा महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केली होती. पण ही डेडलाईन संपली असून आता ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या (सीएमआरएस) तपासणीनंतरच हे स्टेशन प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार असल्याची माहिती आहे.

उत्तर नागपूरचे नागरिक संतप्तमहामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वेंतर्गत पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण भागात इंदोरा मेट्रो स्टेशन वगळता ३८ पैकी ३७ स्टेशन सुरू झाले. या स्टेशनचे बांधकाम आणि सौंदर्यीकरणाचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. विशेषत: या स्टेशनकरिता खासगी जागा मिळण्यास आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे बांधकामाला उशीर झाला. त्यामुळे उत्तर नागपुरातील प्रवाशांना मेट्रो रेल्वेचा लाभ पूर्ण क्षमतेने मिळत नाही. हे स्टेशन लवकर सुरू करण्यासाठी या भागातील वरिष्ठ नागरिकांनी मेट्रो रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी इंदोरा स्टेशन ३० जूनपर्यंत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.

कडबी चौक व नारी मेट्रो स्टेशनवरून जातात प्रवासीमेट्रोने प्रवास करणाऱ्यांची उत्तर नागपुरातील नागरिकांची संख्या वाढली आहे. इंदोरा स्टेशन सुरू न झाल्याने त्यांना कडबी चौक आणि नारी मेट्रो स्टेशनवरून प्रवास करावा लागतो. याकरिता जास्त अंतर कापावे लागते. याशिवाय या दोन्ही स्टेशनवर पार्किंगकरिता पुरेशी जागा नाही. अनेकांना फूटपाथवर गाड्या पार्क करून मेट्रोने प्रवास करावा लागतो.

उत्तर नागपूरची शहराच्या कानाकोपऱ्यात कनेक्टिव्हिटी वाढेलउत्तर नागपूरचे मध्यवर्ती ठिकाण इंदोरा चौकात वाहतुकीची वर्दळ असते. बसेसची व्यवस्था आहे. हे स्टेशन सुरू झाल्यास उत्तर नागपुरातील व्यापारी क्षेत्राचा टप्पा वाढेल. शिवाय मेट्रोने सीताबर्डी आणि शहराच्या कानाकोपऱ्यात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, तसेच पुरूष व महिलांच्या संख्येत निश्चित वाढ होईल. इंदोरा मेट्रो स्टेशन सुरू करण्याची आमची मागणी अनेक वर्षांनंतर पूर्ण होत आहे. अतुल खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते.

"जागेचे अधिग्रहण आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे इंदोरा स्टेशनचे बांधकाम आणि स्टेशन सुरू होण्यास विलंब झाला. पण आता काम अखेरच्या टप्प्यात आहे. ऑगस्ट महिन्यात मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची चमू स्टेशनची तपासणी करण्याची शक्यता आहे. आयुक्तांचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर स्टेशन प्रवाशांसाठी खुले होईल."- अखिलेश हळवे, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी (कॉर्पोरेट).

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर