शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

इंडिगोचे मुंबई-नागपूर विमान हैदराबादला वळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 1:15 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे एका कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी १० पासून विमानांचे उड्डाण व लॅण्डिंग बंद करण्यात आले होते. त्याचा फटाका प्रवाशांना बसला.

ठळक मुद्दे विमानतळावर व्हीआयपींची रेलचेल : प्रवाशांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे एका कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी १० पासून विमानांचे उड्डाण व लॅण्डिंग बंद करण्यात आले होते. त्याचा फटाका प्रवाशांना बसला.इंडिगोचे ६ई४८२ हे विमान निर्धारित वेळेनुसार सकाळी ८.३० वाजता मुंबईहून रवाना झाले आणि नागपुरात १० वाजता उतरणार होते. पण विमानतळावर व्हीआयपी रेलचेल असल्यामुळे विमानाने काही वेळ आकाशात घिरट्या घातल्या. अखेर हैदराबाद येथे सकाळी १०.३० वाजता उतरविण्यात आले. जवळपास दीड तास विमानतळावर थांबविण्यात आले. विमानात इंधन भरल्यानंतर विमानाने हैदराबाद येथून दुपारी १२ वाजता उड्डाण भरले आणि १२.५० वाजता नागपूर विमातळावर पोहोचले. विमान वळविल्याची बातमी विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांना नव्हती, हे विशेष.विमानतळाच्या फ्लाईट स्टेटस चार्टमध्ये इंडिगोचे ६ई४८२ हे विमान नागपुरात १०.४३ वाजता उतरल्याची नोंद आहे. प्रत्यक्ष माहितीनुसार हे विमान नागपुरातून हैदराबाद येथे वळविल्यानंतर तेथून १२.५० वाजता नागपुरात पोहोचले.अन्य विमानांना उशीरशनिवारी इंडिगोचे ६ई ७१३७ नागपूर-हैदराबाद विमानाचे उड्डाण सकाळी ७.३० ऐवजी ७.४६ वाजता झाले. तर जेटचे नागपूर-अलाहाबाद ९डब्ल्यू ३५५३ विमान ४५ मिनिटे विलंबासह सकाळी ८.५५ ऐवजी ९.५५ वाजता रवाना झाले.

टॅग्स :IndigoइंडिगोDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर