शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

देशाचे नवे शैक्षणिक धोरण लवकरच; सत्यपाल सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:44 AM

शैक्षणिक धोरणाचा मसुदा येत्या ३१ मार्चपर्यंत सादर होण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय मानव संसाधन विकास, नदी विकास व गंगा शुद्धीकरण राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी गुरुवारी येथे सांगितले.

ठळक मुद्दे३१ मार्चपर्यंत मसुदा येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील सध्याच्या शैक्षणिक धोरणात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यावर काम सुरू आहे. नवीन धोरण तयार करण्यासाठी प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने तयार केलेला शैक्षणिक धोरणाचा मसुदा येत्या ३१ मार्चपर्यंत सादर होण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय मानव संसाधन विकास, नदी विकास व गंगा शुद्धीकरण राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी गुरुवारी येथे सांगितले.सेंट्रल इंडिया ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटतर्फे गांधीसागर महाल येथील रजवाडा पॅलेस येथे आयोजित एक दिवसीय सेमिनारच्या समारोपपसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी माजी मंंत्री व संस्थेचे अध्यक्ष अनिस अहमद, माजी खासदार गेव्ह आवारी, ग्रामीण आजीविका मिशनच्या सीईओ आर. विमला, नगरसेवक जुल्फीकार भुट्टो आणि अतुल कोटेचा प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ. सत्यपाल सिंग म्हणाले, शिक्षणाचा सर्वात मोठा उद्देश म्हणजे मुलांचा समग्र विकास होय. त्यांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने देशाचे वातावरण बदलेल. मुलांना मूल्यात्मक शिक्षण शिकवण्याची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणात यासर्व गोष्टींचा समावेश करण्याचा विचार आहे. यासोबतच स्थानिक भाषेला मजबूत करणे, देशातील शैक्षणिक सुविधा वाढवणे, गरीब मुलही शिकू शकतील, अशी व्यवस्था निर्माण करणे, अकाऊंटिबिलीटी वाढवणे , स्कील मॅन पॉवर तयार करणे याशिवाय नवीन अत्याधुनिक शिक्षणावरही भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अनिस अहमद यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. अब्दुल आहत यांनी केले. इकरा खान यांनी आभार मानले.

फार्मसीच्या अभ्यासक्रमात असावी सर्व पॅथीच्या औषधांची माहितीफार्मसीच्या अभ्यासक्रमात अ‍ॅलोपॅथीसोबतच आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आदी औषधांंच्या माहितीचाही समावेश व्हावा. याबाबत आपण मंत्रालयातील अधिकाºयांनाही सूचना करणार असल्याचे डॉ. सिंग यांनी सांगितले.देशभरातील तरुण अभियंत्यांशी साधणार संवादयेत्या ३० मार्च रोजी देशभरातील तरुण अभियंत्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. यात देशातील १ लाख अभियंते सहभागी होणार आहेत. ते देशातील सध्याची समस्या व त्यावर उपाय सुचवणार आहेत.

नवीन धोरणात आरएसएसच्या प्रस्तावाचीही दखलराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत बोली व मातृभाषेच्या संरक्षणाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. संघाच्या या प्रस्तावाची दखल नवीन शैक्षणिक धोरणात घेण्यात येणार असल्याचे डॉ. सत्यपाल सिंग यांनी यावेळी मान्य केले. भारतीय भाषा आणि मातृभाषेवर जोर दिला जाईल, असे स्पष्ट करीत भारतातील प्राचीन परंपरा, संस्कृती, ज्ञान टिकवून ठेवणे आणि जीवन मूल्यावरही नवीन धोरणात भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Satyapal Singhसत्यपाल सिंगEducation Sectorशिक्षण क्षेत्र