भारताची अर्थव्यवस्था चार वर्षात गतिशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:21 IST2018-08-26T00:20:29+5:302018-08-26T00:21:45+5:30

गेल्या चार वर्षात देशाची अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. जीडीपीमध्ये भारताचा जगात सहावा क्रमांक आहे. रशिया आणि इटली यांच्या अर्थव्यवस्थेलाही भारताने मागे टाकले आहे. वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट आऊटलूक यासांरख्या जागतिक संस्थांनी सुद्धा यावर शिक्कामोर्तब केले आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सनदी लेखापाल व अर्थशस्त्रज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी येथे केले.

India's economy spans four years | भारताची अर्थव्यवस्था चार वर्षात गतिशील

भारताची अर्थव्यवस्था चार वर्षात गतिशील

ठळक मुद्देविनायक गोविलकर : भाऊसाहेब चांद्रायण स्मृती व्याख्यान

लोकमत  न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या चार वर्षात देशाची अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. जीडीपीमध्ये भारताचा जगात सहावा क्रमांक आहे. रशिया आणि इटली यांच्या अर्थव्यवस्थेलाही भारताने मागे टाकले आहे. वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट आऊटलूक यासांरख्या जागतिक संस्थांनी सुद्धा यावर शिक्कामोर्तब केले आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सनदी लेखापाल व अर्थशस्त्रज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी येथे केले.
सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च नागपूर व दि इन्स्टिट्युट आॅफ इंजिनिअर्स इंडिया नागपूर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर अंबाझरी मार्ग येथील दि इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियर्सच्या सभागृहात ‘भारतीय अर्थव्यवस्था : दशा व दिशा’ या विषयावर आयोजित भाऊसाहेब चांद्रायण स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अर्थशास्त्रज्ञ व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विनायक देशपांडे होते.दि. इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियर्स नागपूर सेंटरचे अध्यक्ष डॉ. दिलीप मसे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉ. गोविलकर यांनी लिहिलेल्या ‘मोदीनॉमिक्स’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
डॉ. गोविलकर यांनी स्वातंत्र्यापासून तर २०१४ पर्यंत अर्थव्यवस्थेचे विश्लेषण केले. डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते अर्थमंत्री म्हणून यशस्वी ठरले. पण तेच पंतप्रधान म्हणून यशस्वी ठरले का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. २०१४ मध्ये नवीन सरकार आले. त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षाही खूप होत्या. त्या सर्वच पूर्ण करणे चार वर्षात शक्य नाही. परंतु धोरण तयार करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते राबवून घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे. गेल्या चार वर्षात नरेंद्र मोदी यांनी नेमके हेच केले आहे. काम करवून घेणे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. चार वर्षात जे काही बदल दिसून येत आहे, हे त्याच्यामुळेच, असेही गोविलकर यांनी स्पष्ट केले. चार वर्षात झालेल्या कामांचा पाढाच त्यांनी यावेळी वाचून दाखवला.
डॉ. विनायक देशपांडे यांनी येणाºया काळात रोजगार हे सर्वात मोठे आव्हान राहणार असल्याचे स्पष्ट केले.
डॉ. कपिल चांद्रायण यांनी पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक केले. सौरभ जोशी यांनी भूमिका विषद केली. संचालन प्रज्ञा नगरनाईक यांनी केले. डॉ. मिलिंद पाठक यांनी आभार मानले.

Web Title: India's economy spans four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.