शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

भारतीय विद्यार्थी अवकाशात सोडणार १०० उपग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 00:52 IST

Indian students launch satellites भारतातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले १०० उपग्रह (सॅटेलाईट) लवकरच अवकाशात साेडले जाणार आहेत. २०२१ च्या ७ फेब्रुवारी राेजी रामेश्वरम येथून हे सर्व उपग्रह एकाच वेळी लाॅन्च केले जाणार आहेत.

ठळक मुद्देवातावरणातील काॅर्बन, ओझाेनचा हाेणार अभ्यास : जागतिक विक्रमही साधला जाईल

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : भारतातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले १०० उपग्रह (सॅटेलाईट) लवकरच अवकाशात साेडले जाणार आहेत. २०२१ च्या ७ फेब्रुवारी राेजी रामेश्वरम येथून हे सर्व उपग्रह एकाच वेळी लाॅन्च केले जाणार आहेत. माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना समर्पित असून विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञानाशी जाेडण्यासह जागतिक विक्रमही या उपक्रमाद्वारे साधला जाणार आहे.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन आणि स्पेस झाेन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने “स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१” चे आयोजन करण्‍यात आले आहे. फाऊंडेशनचे सचिव मिलिंद चौधरी यांनी याबाबत माहिती दिली. देशभरातून १००० विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात येणार आहे. भारतात अशा प्रकारचा उपक्रम हा पहिल्‍यांदाच राबविला जात असून ५ वी ते ८ वी, ९ वी ते १२ वी आणि डिप्लोमा, बीएस्सी, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असे या उपक्रमाचे तीन गट करण्‍यात आले आहेत. १० विद्यार्थ्यांचा एक समूह एक उपग्रह तयार करणार आहे. पत्रपरिषदेत फाऊंडेशनच्या राज्य समन्वयक मनीषा चाैधरी व नागपूर शहर समन्वयक डाॅ. विशाल लिचडे उपस्थित हाेते.

असे असतील उपग्रह

स्पेस झाेन इंडियाच्या सहकार्याने विद्यार्थी २५ ते ८० ग्रॅम वजनाचे १०० उपग्रह तयार करतील. ७ फेब्रुवारी राेजी सकाळी १०.३० वाजता रामेश्वरम येथून हायअल्टीट्युड हेलियम बलूनद्वारे प्रक्षेपित केले जाइल. तीन ते साडेतीन तासात ३० ते ३५ हजार मीटर उंचीवर प्रस्थापित हाेतील. उपग्रह फिट असलेल्या केससाेबत पॅराशूट, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, लाईव्ह कॅमेरा जोडलेला असेल. उंचावर पाेहचताच बलून्स फुटल्यानंतर पॅराशूटद्वारे हे उपग्रह १२५ किलाेमीटरच्या परिघात सुखरुप उतरवले जातील. या उपग्रहाद्वारे दर १००० मीटरवर ओझाेन व काॅर्बनच्या स्थितीची माहिती गाेळा केली जाईल व पुढे शास्त्रज्ञांना सादर केली जाईल.

मराठीतून प्रशिक्षण,नागपुरात कार्यशाळा

महाराष्ट्रातील मुलांसाठी खास मराठीमधून प्रशिक्षण दिले जाणार आहे. उपग्रह म्हणजे काय, त्याचे विविध भाग कुठले, त्यांचे कार्य कसे चालते, या उपग्रहात अभ्यासासाठी कुठले सेंसर असतात, कुठले सॉफ्टवेअर वापरायचे, अशी सर्व माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी ६ ऑनलाईन सेशन घेतले जातील. विदर्भातील मुलांचा वाढता सहभाग बघता ही प्रशिक्षण कार्यशाळा नागपुरातच १८ ते २२ जानेवारी दरम्‍यान साॅफ्टसेन्‍स टेक्‍नोसर्व (इंडिया) प्रा. लि., टेम्‍पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर येथे होईल.

टॅग्स :Studentविद्यार्थीIndiaभारत