शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

भारतीय शास्त्रज्ञांचे संशोधन जगासाठी मार्गदर्शक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 06:46 IST

१०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या व्हर्च्युअल उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपूर : भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन जगभरासाठी मार्गदर्शक ठरत आहे. या असाधारण कामांची चर्चा आज जगभरात होत आहे. भविष्यात भारतीय प्रयोगशाळेतील संशोधन जगाच्या गरजा पूर्ण करणार आहेत, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. विज्ञान क्षेत्रात पुढाकार घेणारेच इतिहास रचत असतात. त्यामुळे देशातील संशोधकांनी तरुणांना प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या व्हर्च्युअल उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी होते.पंतप्रधान म्हणाले, विज्ञान क्षेत्रात भारताने जगातील पहिल्या १० देशांमध्ये स्थान मिळवले आहे. स्टार्टअपच्या बाबतीत जगातील पहिल्या तीन देशांमध्ये भारताचा समावेश आहे. २०१५ पर्यंत १३० देशांच्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत ८१ व्या स्थानावर होता, तर २०२२ मध्ये भारताने ४० व्या स्थानावर झेप घेतली आहे.  येत्या २५ वर्षांत भारत विज्ञान क्षेत्रात मोठी भरारी घेईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात देशाने अंतरीक्ष क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. देशात ३८६ विदेशी सॅटेलाईटचे प्रक्षेपण करण्यात आले. यापैकी ३५१ सॅटेलाईट हे मोदी यांच्या कार्यकाळात सोडण्यात आले. अमेरिकेलाही भारत मदत करीत आहे.

इस्रोची ‘स्पेस ऑन व्हील्स’अमेरिकेच्या ‘नासा’प्रमाणेच भारताच्या इस्रोने अनेक अंतराळ मोहिमा यशस्वीरीत्या राबविल्या आहेत. तिची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी ‘स्पेस ऑन व्हील्स’ ही बस आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

तंत्रज्ञानाने सर्वांना संधी विज्ञान-तंत्रज्ञान कधीही भेदभाव करीत नाही. तो सर्वांना संधी देतो. आपल्या संसाधनांचा गरजेइतकाच वापर करायला हवा. येणाऱ्या पिढीसाठी संसाधने शिल्लक ठेवायला हवीत, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

वैज्ञानिक हे आधुनिक ऋषी-मुनी  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, आजचे वैज्ञानिक हे ऋषी-मुनी आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या काळात पंतप्रधानांच्या आवाहनावर जगाने योग स्वीकारला.

प्रत्येक क्षेत्रात महिलांचा दबदबा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज प्रत्येक क्षेत्रात महिला सशक्तपणे सहभाग नोंदवून आपला ठसा उमटवत आहेत. दबदबा निर्माण करीत आहेत. त्यांचे कार्य मार्गदर्शक ठरत आहे. बाल विज्ञान काँग्रेसच्या माध्यमातून मुलांच्या आकांक्षांना प्रोत्साहन मिळाले. ग्रामीण भागातील जीडीपी वाढावी  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आदिवासीबहुलभाग व ग्रामीण भागातीलजीडीपी वाढायला हवी.यामुळे देश आत्मनिर्भरहोईल आणि आपण पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभी करू शकू.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी