इंडियन रोड काँग्रेस : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 23:04 IST2018-11-22T23:03:10+5:302018-11-22T23:04:02+5:30

इंडियन रोड काँग्रेसच्या अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हेणार आहे.

Indian Road Congress: Chief Minister Fadnavis inaugurated on Friday | इंडियन रोड काँग्रेस : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन

इंडियन रोड काँग्रेस : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन

ठळक मुद्देकेंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंडियन रोड काँग्रेसच्या अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हेणार आहे. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामीण विकास महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री(एमएसआरडीसी) एकनाथराव शिंदे, राज्यमंत्री प्रवीण पोटे, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री रणजित पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. यासोबतच सर्व लोकप्रतिनिधीही उपस्थित राहतील.
देशभरातील सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांशी चर्चा
या अधिवेशनसाठी देशातील सर्वच राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले असून बहुतांश मंत्री सहभागी होणार आहेत. शुक्रवारी दुपारी १२ वाजता विविध राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चर्चा करतील. त्यानंतर गडकरी विदेशी शिष्टमंडळाशी संवाद साधतील.

 

Web Title: Indian Road Congress: Chief Minister Fadnavis inaugurated on Friday