भारतीय हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा; नागपूर जिल्ह्याकरिता ऑरेंज अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 13:45 IST2021-07-08T13:43:30+5:302021-07-08T13:45:37+5:30
भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी ८ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस व वादळीवाऱ्यासह विज पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

भारतीय हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा; नागपूर जिल्ह्याकरिता ऑरेंज अलर्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी ८ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस व वादळीवाऱ्यासह विज पडण्याची शक्यता वर्तवली आहे. ९ जुलै रोजी एक किंवा दोन ठिकाणी विज व वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच १० जुलै ते १२ जुलै या कालावधी मध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
या अनुषंगाने नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी व नदी नाल्या जवळ राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी.
साधारणत: दुपारी २ ते ७ या वेळेत विज पडण्याचा धोका असल्या कारणानें पाऊस व वादळीवारा सुरू असताना झाडा खाली उभे राहू नये. अशा वातावरणात शेतकऱ्यांनी अतिशय काळजी पूर्वक शेताची कामे करावी व शक्य असल्यास घरीच थांबावे. घरातील दारे खिडक्या तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावी.
नदी किंवा नाल्या वरील पुलावरून पाणी वाहत असल्यास तो ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.