शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भारत-न्यूझीलंडमधील वर्ल्डकपच्या फायनलमध्ये हजारो कोटींच्या सट्ट्यामुळे 'बुकींचा ट्रॅफिक जाम'  

By नरेश डोंगरे | Updated: March 8, 2026 23:39 IST

ICC T20 World Cup 2026 Final, Ind Vs NZ: एकाच वेळी हजारो सट्टेबाज लगवाडी करीत असल्यामुळे क्रिकेट विश्वाची पर्वणी ठरलेल्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना आज बुकी बाजारातील ट्रॅफिक जाम करणारा ठरला.

- नरेश डोंगरेनागपूर - एकाच वेळी हजारो सट्टेबाज लगवाडी करीत असल्यामुळे क्रिकेट विश्वाची पर्वणी ठरलेल्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना आज बुकी बाजारातील ट्रॅफिक जाम करणारा ठरला. पहिल्या इनिंगनंतर भारताचे भक्कम आव्हान न्यूझूलंड पेलू शकणार नसल्याचा अंदाज दुसऱ्या इनिंगच्या १० व्या षटकानंतर स्पष्ट झाला. त्यामुळे सट्टेबाजी काहीशी थंडावल्यासारखी झाल्याचे वृत्त होते. दरम्यान, या फायनलमध्ये न्युझीलंडची धुळधाण करीत भारतच विश्वविजेता ठरल्याने न्यूझीलंडवर रोकड लावणारे शेकडो सटोडे थंडगार झाले. तर बुकींची मात्र बल्लेबल्ले झाली.

क्रिकेट सट्ट्याचे मध्य भारतातील सर्वात मोठे सेंटर नागपूर आहे. येथे छोटे मोठे ५०० वर बुकी आहेत. त्यातील यातील अनेक बुकींचा दिल्ली, मुंबई, बेंगलोर, इंदोर, खंडवा, भोपाळ जबलपूर, रायपूर, राजस्थान तसेच देश विदेशातील अनेक बुकिंग सोबत थेट व्यवहार आहे. अशातीलच टॉप १० बुकी दुबईत जाऊन बसले आहे. तर, टॉप २० बुकी गेल्या एक महिन्यापासून गोव्यातून सट्टेबाजी करीत आहेत. त्यांच्या आधारे खयवाडी करणारे उर्वरित बुकी नागपूरसह विदर्भातील वेगवेगळ्या शहरातून सट्टेबाजी करीत होते.

आज फायनलच्या सामन्यावर हजारो कोटींची लगवाडी होणार असल्याचा अंदाज आल्यामुळे बुकीच्या लाईन टॉस होण्यापूर्वीच ओपन झाल्या होत्या. अर्थातच टॉस कोण जिंकणार ही पहिली लाईन होती. त्यानंतर वेगवेगळे डाव सुरू झाले. पहिल्या षटकापासूनच रोकड लावणारांची संख्या प्रचंड मोठी होती. त्यामुळे बुकींच्या लाईन सारख्या व्यस्त होत्या. सटोडे रक्कम लावण्यासाठी वारंवार बुकिंशी संपर्क करत होते. मात्र अनेकांचा संपर्क होत नव्हता. पहिल्या ईनिंगच्या अखेरिस तर 'ट्रॅफिक जाम' सारखी स्थिती होती, असे संबंधित सूत्रांनी सांगितले

बुकी म्हणतात...अशा होत्या लाईन्स !सबंधित वर्तुळाच्या चर्चेनुसार, रविवारच्या फायनल मॅचवर नागपूर-विदर्भातून १००० ते १२०० कोटींची खयवाडी-लगवाडी झाली. सट्टा बाजारात सामन्याच्या मॅच ऑड्ससोबतच “सेशन”वरही मोठ्या प्रमाणात रोकड लागली. पॉवर प्लेमध्ये होणाऱ्या धावा, पहिल्या ६ षटकांतील स्कोअर, १० षटकांपर्यंतचा एकूण धावसंख्या, पहिल्या विकेटची, पहिल्या भागीदारीची, टॉप फलंदाज आणि टॉप गोलंदाज यावरही कोट्यवधींची लगवाडी-खयवाडी झाली.

ओव्हर नंतर नवीन सेशन लाईनसूत्रांच्या माहितीनुसार, मॅच ऑड्सव्यतिरिक्त प्रत्येक षटकानंतर नवी 'सेशन लाईन' उघडली गेली. उदाहरणार्थ, ६ षटकांत ३५ ते ४० धावा किंवा १० षटकांत ७० ते ८० धावांची लाईन दिली गेली. चौकार-षटकारांसाठी 'फॅन्सी लाईन' देण्यात आली होती. विशिष्ट फलंदाजाच्या ३० प्लस किंवा ५० प्लस धावांसाठी 'स्पेशल रेट' तसेच शेवटच्या षटकासाठी आणि अंतिम खेळाडूसाठीही वेगवेगळे भाव देण्यात आले होते. त्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लागला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : World Cup Final: India-New Zealand match fuels betting frenzy.

Web Summary : India's World Cup final against New Zealand saw massive betting, exceeding thousands of crores. Bookies in Nagpur, Dubai, and Goa profited as India's victory left New Zealand bettors disappointed. Extensive betting lines opened on every aspect of the game.
टॅग्स :T20 World Cupट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६India VS New Zealandभारत विरुद्ध न्यूझीलंडnagpurनागपूरSatta Bazarसट्टा बाजारCrime Newsगुन्हेगारी