शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया आघाडी, फेविकॉल से भी नही जुडेगा..! प्रफुल्ल पटेल यांची टीका

By कमलेश वानखेडे | Updated: September 2, 2023 18:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा

नागपूर : विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत ‘जेथे शक्य असेल तेथे आघाडी करून लढू, असा ठराव घेण्यात आला. मात्र, यांना अनेक राज्यात एकमेकांविरोधात लढावेच लागेल. इंडिया आघाडी पूर्णपणे विस्कळित झाली आहे. ‘जुडेंगे नही तो जितेंगे कैसे, ये तो फेविकॉल से भी नही जुडेगा’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांनी केली.

अजित पवार गटाचा शनिवारी नागपुरातील देशपांडे सभागृहात संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला प्रफुल्ल पटेल यांच्यासह अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी आ. राजेंद्र जैन, नाना पंचबुद्धे आदी उपस्थित होते. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी विरोेधकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, इंडिया आघाडीच्या पाटण्यातील पहिल्या बैठकीला आपण होतो. या, बसा व जेवन करून जा, अशी ती बैठक होती. त्याच वेळी हे काही जुळणार नाही हे आपल्या लक्षात आले होते. आता मुंबईच्या तिसऱ्या बैठकीत ‘इंडिया’चा लोगो ठरविण्यासाठी एकमत होऊ शकले नाही, त्यामुळे लोगोचे लोकार्पण झाले नाही. यांचा समन्वयक ठरला नाही. शेवटी १३ लोकांची समिती ठरावी लागली. दुसरीकडे देशातील जनतेला विश्वास असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्यामुळे जगात देशाचा सन्मान वाढला आहे, अशी तुलनात्मक प्रशंसा पटेल यांनी केली. यावेळी राष्ट्रवादीचे नागपूर शहर अध्यक्ष प्रशांत पवार, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवनकर, आभा पांडे, सतीश शिंदे, नरेश अरसडे, राजेश माटे, विश्वाल खांडेकर आदी उपस्थित होते.

आता भाजपसोबत गेलो तर चुक काय ?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत बसायला तयार नव्हती. आम्ही काँग्रेसला समजावले. त्यावेळी सत्तेतून लोकांची कामे करण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत गेलो. मग आज त्याच उद्देशाने आम्ही भाजपसोबत गेलो तर काय चुक केली, असा सवालही पटेल यांनी केला.

अजित पवारांवर आमदारांना विश्वास

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विश्वास असल्यामुळेच ५३ पैकी ४३ आमदार सोबत आले आहेत. त्यांच्या त्यांचे भविष्य अजित पवारांकडे सुरक्षित वाटत आहे. ८ सप्टेंबरपर्यंत आयोगाकडे म्हणणे मांडायचे आहे. त्यानंतर १५ ते २० दिवसात निकाल येईल. पक्ष व चिन्ह हे दोन्ही आपल्याकडेच राहतील, असा विश्वासही पटेल यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्रीपदाची संधी गमावली- २००४ मध्ये काँग्रेसच्या ६९ तर राष्ट्रवादीच्या ७१ जागा निवडून आल्या. तरी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिले. गेल्या निवडणुकीत ५६ आमदार असलेल्या शिवसेनेला पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देऊन ५४ आमदार राष्ट्रवादीला नंतरची अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देता आले असते. पण तसेही झाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला दोनदा मुख्यमंत्रीपदाची संधी आली, पण ती गमावली. त्यामुळे राष्ट्रवादीची वाढ थांबली, असा ठपकाही पटेल यांनी ठेवला.

टॅग्स :PoliticsराजकारणPraful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीAjit Pawarअजित पवार