भाेरगड येथे स्वातंत्र्य दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:13 IST2021-08-17T04:13:33+5:302021-08-17T04:13:33+5:30
काटाेल : तालुक्यातील भाेरगड येथील श्री गजानन महाराज विद्यालय येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सिंधू एज्युकेशन साेसायटी ...

भाेरगड येथे स्वातंत्र्य दिन
काटाेल : तालुक्यातील भाेरगड येथील श्री गजानन महाराज विद्यालय येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सिंधू एज्युकेशन साेसायटी जरीपटका नागपूरच्या अध्यक्ष वीणा बजाज यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष ज्याेती दुहिलानी, सहसचिव प्रताप बजाज, काेषाध्यक्ष डींपी बजाज, राजकुमारी मेघराजानी, प्रिन्स बजाज, भाेरगडचे सरपंच उमराव उईके, उपसरपंच राेशन खरपुरिया, ग्रा.पं. सदस्य नारायण शेंडे, निरंजना कुमेरिया, अर्चना सरियाम, कुसुम गजाम, याेगिता गजाम, मुख्याध्यापक एन. बी. गहूकर, पर्यवेक्षक सुदाम राखडे, अर्चना हिवसे, पी. के. ठाकरे, व्ही. बी. अकर्ते, बी. जी. भाेयर, प्रमाेद भेलकर, एस. पवार, छाया भेलकर, शंकर रेलवानी, विकास नासरे आदी उपस्थित हाेते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत सादर केले. पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश, शूज व शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. संचालन निर्मला चाैधरी यांनी केले. पी. के. ठाकरे यांनी आभार मानले. विजय कटरे, रमेश खुरपुरिया, दिलीप कुमेरिया, एस. आगरकर, लेखराज पाटील, मंदा बावणे आदींनी सहकार्य केले.