शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमधील इंडामर एमआरओ अदानी डिफेन्सच्या ताब्यात

By मोरेश्वर मानापुरे | Updated: August 11, 2025 20:06 IST

एव्हिएशन एमआरओ क्षेत्रात विस्तार : १०० टक्के हिस्सेदारी खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर :अदानी डिफेन्स सिस्टीम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेडने (एडीएसटीएल) आपल्या व्हेंचर होरायझन एअरो सोल्यूशन्स लिमिटेडमार्फत प्राइम एअरो सर्व्हिसेस एलएलपीसोबत मिळून नागपुरातील मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ) इंडामर टेक्निक्स प्रायव्हेट लिमिटेडमधील (आयटीपीएल) १०० टक्के हिस्सेदारी नुकतीच खरेदी केली. इंडामर टेक्निक्स हा भारतातील अग्रगण्य खासगी क्षेत्रातील एमआरओ आहे, हे विशेष.

होरायझन हा एडीएसटीएल आणि प्राइम एअरो यांचा ५०-५० टक्के भागीदारीतला व्यवसाय आहे. प्राइम एअरोचे मालक प्रजय पटेल हे इंडामर टेक्निक्सचे संचालकदेखील आहेत. एमआरओ म्हणजे विमानांच्या देखभाल, दुरुस्ती व ओव्हरहॉलची सेवा. भारतात एमआरओ बाजार वेगाने वाढत असून, नागपूरचे भौगोलिक स्थान व मिहानमधील विशेष पायाभूत सुविधा यामुळे शहराला एमआरओ हब म्हणून विकसित होण्याची मोठी संधी आहे.

दहा हँगर व १५ विमाने ठेवण्याची क्षमताआयटीपीएलने ३० एकर क्षेत्रफळात अत्याधुनिक ग्रीनफील्ड सुविधा उभारली आहे. या सुविधेत दहा हँगर असून त्यात एकूण १५ विमाने ठेवण्याची क्षमता आहे. आयटीपीएलला डीजीसीए, एफएए (यूएसए) आणि इतर जागतिक नागरी एव्हिएशन नियामक संस्थांकडून मान्यता मिळाली आहे. ही कंपनी भारत आणि जगातील प्रमुख ग्राहकांना एमआरओ सेवा पुरवते. त्यात लीज रिटर्न चेक्स, हेवी सी-चेक्स, दुरुस्ती आणि विमान पेंटिंगचा समावेश आहे.

अदानी एअरपोर्ट्सचे संचालक जीत अदानी म्हणाले, हे अधिग्रहण भारताला जगातील प्रमुख एमआरओ केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या आमच्या उपक्रमातील पुढील पाऊल आहे.  अदानी डिफेन्स अँड प्राइमस्पेसचे सीईओ आशिष राजवंशी म्हणाले, हे अधिग्रहण अदानी डिफेन्स अँड प्राइमस्पेसच्या व्हिजनमधील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. एमआरओ सेवा प्रदान करण्यास उत्सुक आहोत. इंडामर टेक्निक्स आणि प्राइम एअरोचे संचालक प्रजय पटेल म्हणाले, आम्ही अदानी डिफेन्स अँड प्राइमस्पेससोबत मिळून इंडामर टेक्निक्सला नवीन उंचीवर नेऊ. भारतातून एक जागतिक दर्जाचे एमआरओ इकोसिस्टम निर्माण होण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

टॅग्स :nagpurनागपूरAdaniअदानी