देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानी सुरक्षाव्यवस्थेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 22:14 IST2022-06-23T22:13:33+5:302022-06-23T22:14:05+5:30
Nagpur News शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील धरमपेठ परिसरातील निवासस्थानाबाहेर सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानी सुरक्षाव्यवस्थेत वाढ
नागपूर : शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील धरमपेठ परिसरातील निवासस्थानाबाहेर सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे.
राज्यातील राजकीय नाट्यात सातत्याने नवनवीन वळणं येत असताना नागपुरात शिवसैनिकांकडून भाजपविरोधात निदर्शने करण्यात आली. कुठलाही गैरप्रकार व्हायला नको, यासाठी सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांना संपर्क केला असता, त्यांनी सध्याची स्थिती पाहता सावधगिरीची उपाययोजना म्हणून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मात्र त्याला कडेकोट बंदोबस्त असे म्हणता येणार नाही. आम्ही अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत, असे स्पष्ट केले.