अंधूक दिसण्याच्या समस्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 10:33 AM2020-10-27T10:33:35+5:302020-10-27T10:37:06+5:30

Health Nagpur News 'मायोपिया' म्हणजे अंधूक दिसण्याची समस्या असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पूर्वी हे प्रमाण १०० मध्ये पाच ते सात रुग्णांवर होते. आता ते १० ते १५ रुग्णांवर आल्याचे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Increased problem of blurred vision | अंधूक दिसण्याच्या समस्येत वाढ

अंधूक दिसण्याच्या समस्येत वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देमायोपिया आजाराचे रोज १० ते १५ रुग्ण स्क्रीन टाईम वाढल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा फटका केवळ बाधित रुग्णांनाच बसला नाही तर वर्क फ्रॉम होम, स्कूल फ्रॉम होम करण्यांनाही बसला आहे. विशेषत: मुलांचा जास्तीत जास्त वेळ लॅपटॉप, मोबाईल व टीव्ही बघण्यात जात आहे. स्क्रीन टाईमचा डोळ्यांवर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी, 'मायोपिया' म्हणजे अंधूक दिसण्याची समस्या असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पूर्वी हे प्रमाण १०० मध्ये पाच ते सात रुग्णांवर होते. आता ते १० ते १५ रुग्णांवर आल्याचे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या या काळात सुरुवातीला लॉकडाऊन असल्याने मोठ्या संख्येत पालक घरीच होते. आजही अनेक पालक घरूनच काम करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या शाळा बंद असल्या तरी आॅनलाईन वर्ग सुरू आहे. काही शाळांमधील पाचवी ते दहावीपर्यंतचे पूर्ण वर्ग होतात. त्यांचा जास्तीत जास्त वेळ संगणक, लॅपटॉप किंवा मोबाईलवर जातो. अशा गॅझेटचा जास्त वापर केल्याने जवळच्या वस्तू सहज दिसत असल्या तरी दूरचे दिसत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जीवनसत्त्वयुक्त नसलेला आहार, व्यायामाचा अभाव आणि मोबाईल फोनचा मयार्देपेक्षा जास्त वापर याला कारणीभूत ठरत असल्याचे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, ह्यमायोपियाह्ण असलेल्या व्यक्तीला जवळ असलेल्या वस्तू नीट दिसतात. परंतु दूरच्या वस्तू पाहण्यात अडचण येते. डोळ्यांचे स्नायू कमकुवत होण्यामुळेदेखील मायोपिया होऊ शकतो.

मेयोच्या नेत्ररोग विभागात रुग्ण वाढले
मेयोच्या नेत्ररोग विभागाचे प्रमुख व वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी चव्हाण म्हणाले, कॉर्नियातील बिघाड, औद्योगिकीकरण, इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा वाढता वापर, आनुवंशिकता, घरांमध्ये बसून तासन्तास लॅपटॉपवर काम करणे किंवा मोबाईल पाहणे अशा विविध कारणांमुळे शहरी भागातील लोकांमध्ये मायोपिया ही समस्या वाढत आहे. मेयोच्या नेत्ररोग विभागात पूर्वी १०० मधून पाच ते सात रुग्ण यायचे, परंतु अलीकडे १० ते १५ रुग्ण येत आहेत.

गॅझेटचा वापर ठरविणे आवश्यक
अलीकडे मोठ्यांसह लहान मुलांकडून लॅपटॉप व मोबाईलचा वापर वाढला आहे. परंतु या गॅझेटचा वापर किती करावा, हे ठरवून घेतले पाहिले. यासाठी वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. सोबतच नियमित व्यायाम करावा, यासाठी धावणे, चालणे आणि योग करणे फायदेशीर ठरू शकते. नियमित नेत्र तपासणीसोबतच योग्य चष्मा किंवा लेन्सचा वापर करावा.
-डॉ. रवी चव्हाण
प्रमुख, नेत्ररोग विभाग, मेयो

Web Title: Increased problem of blurred vision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य