ग्रामीण भागात काेराेना संक्रमणात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:09 IST2021-04-27T04:09:06+5:302021-04-27T04:09:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर/नरखेड/कळमेश्वर/कामठी/रामटेक/हिंगणा/उमरेड/कुही/काटाेल : नागपूर जिल्ह्यात रविवार (दि. २५)च्या तुलनेत साेमवारी (दि. २६) काेराेना रुग्णांमध्ये थाेडी वाढ झाली ...

ग्रामीण भागात काेराेना संक्रमणात वाढ
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर/नरखेड/कळमेश्वर/कामठी/रामटेक/हिंगणा/उमरेड/कुही/काटाेल : नागपूर जिल्ह्यात रविवार (दि. २५)च्या तुलनेत साेमवारी (दि. २६) काेराेना रुग्णांमध्ये थाेडी वाढ झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक २८६ रुग्ण सावनेर तालुक्यात आढळून आले असून, नरखेड तालुक्यात २१३, कळमेश्वरमध्ये २०८, कामठीत १५३, रामटेकमध्ये १३७, हिंगणा तालुक्यात १२०, उमरेडमध्ये ९५, कुही तालुक्यात ८७ तर काटाेल तालुक्यात ७६ रुग्णांची नाेंद करण्यात आली.
काेराेना संक्रमणामध्ये सावनेर तालुका अग्रणी राहिला आहे. तालुक्यात साेमवारी एकूण २८६ रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, यातील ६२ रुग्ण शहरातील तर २२४ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. नरखेड तालुक्यात २१३ रुग्ण आढळून आले. यात शहरातील ३३ तर ग्रामीण भागातील १८० रुग्णांचा समावेश आहे. सावरगाव प्राथमिक आराेग्य केंद्रातील गावांमध्ये ६९, जलालखेडा प्राथमिक आराेग्य केंद्रातील गावांमध्ये १०४ तर मेंढला प्राथमिक आराेग्य केंद्रातील गावांमध्ये सात नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २,७८३ झाली असून, यात शहरातील ४५७ तर ग्रामीण भागातील २,३१६ ॲक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे.
कळमेश्वर तालुक्यातही २०८ रुग्णांची भर पडली आहे. यात कळमेश्वर ब्राह्मणी शहरातील २३ तर ग्रामीण भागातील १८५ रुग्ण आहेत. तालुक्यातील मोहपा शहरात २७, धापेवाडा येथे २१, कोहळी १८, मांडवी १३, गोंडखैरी १२, उबाळी व निमजी येथे प्रत्येकी ७, वरोडा ६, बुधला व तिष्टी (बु.) येथे प्रत्येकी ५, पानउबाळी, बोरगाव (बु.) व झुनकी येथे प्रत्येकी ४, वाढोणा (बु.), भडांगी, म्हसेपठार, खुमारी, पारडी (देशमुख) व पिल्कापार येथे प्रत्येकी ३, सावळी (खु.), परसोडी, कन्याडोल, लोणारा, घोगली, उपरवाही, पिपळा, मडासावंगी, तोंडाखैरी, बोरगाव (खु.) व आदासा येथे प्रत्येकी २ तसेच गुमथळा, चिचभवन, निंबोली, दहेगाव, सोनपूर, निळगाव, खानगाव, मोहगाव, वाढोणा (खु.), सवंद्री, कोकर्डा व तिष्टी (बु.) येथे प्रत्येकी एक रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आला आहे.
कामठी तालुक्यात साेमवारी ६२१ नागरिकांची काेराेना चाचणी करण्यात आली असून, यातील १५३ जणांना काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. रामटेक तालुक्यात १३७ रुग्णांनी नाेंद करण्यात आली आहे. यात शहरातील १५ तर ग्रामीण भागातील १२२ रुग्ण आहेत. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ५,३१० झाली असून, २,२४५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के व तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. चेतन नाईकवार यांनी दिली.