रामटेकमधील पाेलीस बंदाेबस्तात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:08 IST2021-04-17T04:08:41+5:302021-04-17T04:08:41+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : शहरासह तालुक्यातील काेराेना संक्रमण राेखण्यासाठी तसेच नागरिकांना काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे पालन करावे म्हणून रामटेक ...

रामटेकमधील पाेलीस बंदाेबस्तात वाढ
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : शहरासह तालुक्यातील काेराेना संक्रमण राेखण्यासाठी तसेच नागरिकांना काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे पालन करावे म्हणून रामटेक शहरातील पाेलीस बंदाेबस्त शुक्रवार(दि. १६)पासून वाढविण्यात आला आहे. प्रत्येक दुकानदार व नागरिकाने या उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करण्याचे आवाहन पाेलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून, या उपाययाेजनांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व प्रसंगी कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
रामटेक शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये काेराेनाचे रुग्ण व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. वारंवार सूचना व आवाहन करूनही नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याने त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी पाेलिसांनी रामटेक शहर व तालुक्यातील नगरधन येथील विविध मार्गाने रुट मार्चदेखील केला. यावेळी पाेलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना स्वत:साेबतच इतरांची काळजी घेण्याचे व प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे पालन करण्याचे आवाहन केले.
तालुक्यातील ग्रामीण भागाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. मृत्यूचा दरही वाढत चालला आहे. याला आळा घालण्यासाठी कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नका, मास्कचा नियमित वापर करा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा, गर्दी करणे व गर्दीत जाणे टाळा, लक्षणे आढळून आल्यास चाचणी करा, पाेलिसांना सहकार्य करा यासह अन्य मार्गदर्शक सूचनाही दिल्या जात आहेत. या उपाययाेजनांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पाेलीस अधिकाऱ्यांनी दिला. या दाेन्ही ठिकाणच्या रुट मार्चमध्ये उपविभागीय पाेलीस अधिकारी नयन आलूरकर, तहसीलदार बाळासाहेब मस्के, ठाणेदार प्रमाेद मकेश्वर, रामटेक नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्यासह पालिका व पाेलीस कर्मचारी तसेच हाेमगार्ड सहभागी झाले हाेते.
...
वस्तूंची लपूनछपून विक्री
राज्य शासनाने रात्री संचारबंदी आणि दिवसा जमावबंदीचे आदेश दिले असून, अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, काही दुकानदार अर्धे शटर उघडून तर काही दुकानदार दुकानांच्या मागच्या बाजूने लपूनछपून वस्तू विकतात. ती दुकाने समाेरच्या भागाने बंद असल्याचेच दिसतात. हा प्रकार रुट मार्चदरम्यान पाेलिसांच्याही निदर्शनास आला. विशेष म्हणजे, बाजारात जीवनावश्यक वस्तू सहज उपलब्ध हाेत असताना असले प्रकार सकाळच्या वेळी सुरू असतात. या काळात पाेलीस व पालिकेचे कर्मचारी सहसा गस्तीवर नसतात.