कोरोनाबाधितांच्या मृत्यूमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST2021-01-03T04:11:11+5:302021-01-03T04:11:11+5:30
नागपूर : डिसेंबर महिन्यात ११ तारखेनंतर तब्बल २० दिवसानी पहिल्यांदाच कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले. शनिवारी ११ रुग्णांचे मृत्यू झाले ...

कोरोनाबाधितांच्या मृत्यूमध्ये वाढ
नागपूर : डिसेंबर महिन्यात ११ तारखेनंतर तब्बल २० दिवसानी पहिल्यांदाच कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले. शनिवारी ११ रुग्णांचे मृत्यू झाले तर ३८४ नव्या बाधितांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १२४५५० झाली असून मृतांची संख्या ३९५१वर पोहचली आहे. आज २६४ रुग्ण बरे झाले.
नागपूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून ४ हजारांखाली गेलेल्या चाचण्यांची संख्या आज पुन्हा ५ हजारांवर पोहचली. यात ४३७९ आरटीपीसीआर तर ६२१ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. एम्सच्या प्रयोगशाळेतून १४, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ४८, मेयोच्या प्रयोगशाळेतून ७१, माफसूच्या प्रयोगशाळेतून ६, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून ४२ तर खासगी प्रयोगशाळेतून १६५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामध्ये शहरातील ३४३, ग्रामीण भागातील ३८ तर जिल्हाबाहेरील ३ रुग्ण आहेत. मृतांमध्ये शहरातील ५, ग्रामीणमधील ३ तर जिल्हाबाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. . आतापर्यंत ११६६८२ रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्तीचा दर ९३.६८ टक्के झाला आहे.
- असे वाढले मृत्यू
डिसेंबर महिन्याच्या ३ तारखेला सर्वाधिक १५ रुग्णांचे मृत्यू झाले. त्यानंतर ६ तारखेला ११, ७ तारखेला १३, १० व ११ तारखेला प्रत्येकी ११ रुग्णांचे मृत्यू झाले. त्यानंतर सलग २० दिवस मृत्यूची संख्या दहाच्या आत होती. परंतु शनिवारी ११ मृत्यूची नोंद झाली. डॉक्टरांच्या मते, गंभीर स्थितीत उशिरा उपचारासाठी आल्यामुळे व खासगी हॉस्पिटलमधून शेवटच्या स्टेजमध्ये आलेल्या रुग्णांमुळे मृत्यूचा आकडा वाढला आहे.
-दैनिक संशयित : ५०००
-बाधित रुग्ण : १२४५५०
_-बरे झालेले : ११६६८२
- उपचार घेत असलेले रुग्ण : ३९१७
- मृत्यू : ३९५१