आयकर विभागाची फसवणूक
By Admin | Updated: August 18, 2014 00:30 IST2014-08-18T00:30:12+5:302014-08-18T00:30:12+5:30
अधिकाऱ्याच्या बनावट स्वाक्षऱ्या करून प्राप्तिकर खात्याला लाखो रुपयांचा बेमालूमपणे गंडा लावला जात असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी सदर पोलिसांनी गुन्हे दाखल करून

आयकर विभागाची फसवणूक
अधिकाऱ्याची बनावट सही : ६६ लाखांचा गंडा
नागपूर : अधिकाऱ्याच्या बनावट स्वाक्षऱ्या करून प्राप्तिकर खात्याला लाखो रुपयांचा बेमालूमपणे गंडा लावला जात असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी सदर पोलिसांनी गुन्हे दाखल करून प्रकरण तपासास घेतले आहे.
प्राप्तिकर खात्याचे सहआयुक्त हेमंत माधवराव वांढरे (रा. लक्ष्मी प्लाझा,मानकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, काही जणांनी १ एप्रिल २०१० पासून प्राप्तिकर खात्याच्या कार्यालयातून रिफंडचे चेकबुक चोरले. त्यावर खंडाते नामक अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी केली आणि त्याआधारे लाखो रुपयांची रक्कम आपल्या खात्यात जमा करून घेतली. गेल्या चार वर्षात अशा प्रकारे आरोपी अमित कुमार कानुंगे, आचल जगदीश मंगलानी, अनसूया धुर्वे, अरविंद सोनी, भाग्यवती रामेश्वर शर्मा, ब्रिजेश खरे, धर्मेंद्र विश्वकर्मा, दीपक कुमार जवाळकर, दीपक नानू पवार, दिनेश प्यारेलाल पवार, जगदीश मंगलानी, जितेद्र रामेश्वर शर्मा, कमलेश किसनचंद्र रामनानी, मुरलीधर बालकृष्णन नायर, नरेश मनोहरलाल देवानी, परेश चंद्रकांत राजा, प्रवीण क्रिष्णराव देवीकर, रचना ज्ञानी, राहुल शामराव बिसनंद्रे रिना ए. कानुंगे, संतोष शंकरलाल दादाजे, सीमा शर्मा, शामसुंदर गोपीनाथ शुक्ला, शिवकुमार विजय विराणी, स्वाती रामनानी, वकील सुलेमान, विजय धनोजी गोरले, विक्रम पुंडवाणी, विनोद पारी विश्वनाथ टिकाराम विश्वकर्मा, देवाशीश दास, मोरानी देवीदास दास, मुरलीधरण नायर, प्रकाश बेलसुटे, ंिशल्पा ए. भुते, सुजित अशोक रोडगे, स्वाती रामनानी, उषा नायर आणि इतरांनी प्राप्तिकर विभागाला ६६ लाख, ४६ हजारांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. वांढरे यांच्या तक्रारीवरून उपरोक्त आरोपींवर सदर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)