शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

अभ्यासक्रमात संघावरील प्रकरणाचा समावेश अवैध : हायकोर्टात याचिका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 8:34 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील बी.ए. पदवीच्या चौथ्या सेमिस्टरमधील इतिहास विषयात ‘राष्ट्र बांधणीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका’ या प्रकरणाचा समावेश करण्याच्या निर्णयाविरुद्ध नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. विद्यापीठाची ही कृती अवैध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना बळजबरी केली जाऊ शकत नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील बी.ए. पदवीच्या चौथ्या सेमिस्टरमधील इतिहास विषयात ‘राष्ट्र बांधणीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका’ या प्रकरणाचा समावेश करण्याच्या निर्णयाविरुद्ध नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. विद्यापीठाची ही कृती अवैध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने बी.ए. पदवीच्या चौथ्या सेमिस्टरमधील इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. अभ्यासक्रमात संघावरील प्रकरणाचा समावेश करण्यात आला असून ‘साम्यवादाचा उदय व विकास’ हे प्रकरण वगळण्यात आले आहे. आरएसएस ही नोंदणीकृत संस्था नाही. त्यामुळे सरकारी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात संघावरील प्रकरणाचा समावेश करणे अवैध आहे. या निर्णयाला विविध सामाजिक संघटना व विद्यार्थ्यांचा विरोध आहे. स्वातंत्र्यलढ्यामध्ये संघाचे योगदान शून्य आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना सत्य परिस्थितीच्या विपरीत अभ्यासक्रम शिकण्याची बळजबरी केली जाऊ शकत नाही असे मून यांनी याचिकेत नमूद केले आहे.निवेदनाची दखल नाहीमून यांनी ९ जुलै २०१९ रोजी कुलगुरू यांना निवेदन सादर करून अभ्यासक्रमात संघावरील प्रकरणाचा समावेश करण्याचा निर्णय मागे घेण्याची व साम्यवादावरील प्रकरण अभ्यासक्रमात कायम ठेवण्याची मागणी केली होती. परंतु, त्यांच्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकेत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेवर पुढच्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले कामकाज पाहतील.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ