ट्रॅफिक ट्रेनिंग पार्कचे उद्घाटन

By Admin | Updated: August 12, 2016 02:51 IST2016-08-12T02:51:35+5:302016-08-12T02:51:35+5:30

हिरो मोटोकॉर्प लिमिटेडने राष्ट्रीय मोहिमेंतर्गत लोकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत चांगल्या सवयी बिंबवण्याकरिता मनपा, शहर वाहतूक पोलीस आणि ...

Inauguration of traffic training park | ट्रॅफिक ट्रेनिंग पार्कचे उद्घाटन

ट्रॅफिक ट्रेनिंग पार्कचे उद्घाटन

हिरो मोटाकॉर्पचा उपक्रम : रस्ता सुरक्षिततेवर प्रशिक्षण
नागपूर : हिरो मोटोकॉर्प लिमिटेडने राष्ट्रीय मोहिमेंतर्गत लोकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत चांगल्या सवयी बिंबवण्याकरिता मनपा, शहर वाहतूक पोलीस आणि राज्य शिक्षण विभागाच्या सहयोगाने गुरुवारी धरमपेठ येथे नवीन ट्रॅफिक ट्रेनिंग पार्कचे उद्घाटन केले.
महापौर प्रवीण दटके, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, हिरो मोटोकॉर्पचे सीएसआर व सीआयओ प्रमुख विजय सेठी, राष्ट्रीय विक्री प्रमुख ए. श्रीनिवासू, राष्ट्रीय सर्व्हिसेसचे सहायक उपाध्यक्ष व सीआरएम राजेश मुखिजा, राष्ट्रीय प्रमुख (सुरक्षा) राजेश चोपडा आणि डॉ. पी. के. जैन यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि हिरो सेफ्टी चमूचे सदस्य उपस्थित होते.
बाजारप्रमुख म्हणून कंपनीच्या स्थानाला अधिक प्रबळ करीत हिरो मोटोकॉर्प रस्ता सुरक्षितता मोहिमेबाबत जागरुकता निर्माण करण्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे. राईड सेफ इंडिया कार्यक्रमांतर्गत सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी विविध प्रकल्प राबविले आहेत. त्याअंतर्गत नागपुरातील उपक्रम अनोखा आहे. मोहिमेच्या माध्यमातून एक लाखापेक्षा अधिक लोकांना सुरक्षा प्रदान केल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. राईड सेफ इंडिया ही भारतात रस्ता सुरक्षिततेला चालना देण्यासाठी सर्वांगीण देशव्यापी मोहीम आहे. ट्रॅफिक ट्रेनिंग पार्कमध्ये नागपुरातील शालेय विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षितता नियमांची माहिती देण्यात येणार आहे. नियुक्त करण्यात आलेले प्रशिक्षित सुरक्षा शिक्षक रोड सेफ्टी क्लबअंतर्गत नोंद करण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षिततेविषयी जागरुकता कार्यक्रमांचे आयोजन करतील. येथील हॉलमध्ये सिम्युलेटरद्वारे विद्यार्थ्यांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कंपनी रस्ता सुरक्षा जागरुकता आणण्यासाठी सोशल मीडिया माध्यमातून युवकांपर्यंत पोहोचणार आहे. लघु व्हिडिओ कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. (वा.प्र.)

Web Title: Inauguration of traffic training park