श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण कार्यालयाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:11 IST2021-01-16T04:11:13+5:302021-01-16T04:11:13+5:30
नरखेड : श्रीरामजन्मभूमी अयोध्या येथे मंदिर निर्माण करण्याकरिता येथे कार्यालय गृहसंपर्क व ग्रामसंपर्क राबविण्याकरिता कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. ...

श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण कार्यालयाचे उद्घाटन
नरखेड : श्रीरामजन्मभूमी अयोध्या येथे मंदिर निर्माण करण्याकरिता येथे कार्यालय गृहसंपर्क व ग्रामसंपर्क राबविण्याकरिता कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासद्वारा भव्य श्रीराम मंदिर निर्माण करण्यात येत आहे. त्याकरिता स्थानिक लोकांकडून निधी मिळावा, गृहसंपर्क वाढवावा, ग्रामीण भागात अयोध्येत निर्माण होत असलेल्या श्रीराम मंदिराच्या बांधकामाकरिता निधी गोळा करण्याचे काम करण्यासाठी नरखेड शहरात गांधी चैक येथे कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी सु.श्री. अर्पिता दीदी मानसभारती, पळसरामजी कळंबे महाराज, ह.भ.प. ठाकरे महाराज यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी अर्पिता दीदी व कळंबे महाराज यांचे निधी समर्पणाच्या उद्देशाबाबत मार्गदर्शन झाले.
यावेळी न.प. उपाध्यक्ष अजय बालपांडे, उकेश चव्हाण, मनोज कोरडे, संजय कामडे, भारत अरमरकर, प्रमोद टोनपे, सुरेश शेंद्रे, राजू कुर्वे, हरिकांत माळोदे, सचिन चरडे, अशोक वेरूळकर, जयदीप गोहडे, गजेंद्र हवाले, राहूल होले, प्रज्वल खंडारे, विशाल रेवतकर त्याचप्रमाणे सर्व तालुक्यातील रामभक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.