शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

अखाद्य बर्फाचा होतोय जीवघेणा गोळा

By admin | Updated: May 6, 2017 02:18 IST

उन्हाळा सुरू झाल्याने सध्या शहरातील विविध चौकांत सर्वत्र बर्फ गोळ्यांची दुकाने लागली आहेत. मुलांसह तरुण या बर्फ गोळ्यांचा आस्वाद

इंदूरच्या महापौर मालिनी गौड यांनी उलगडले यशाचे रहस्य : महापालिका बोध घेणार का ? नागपूरचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. नागपूरचे नितीन गडकरी केंद्रात हेवीवेट मंत्री. नागपुरात भाजपचे अजय संचेती आणि डॉ. विकास महात्मे हे दोन राज्यसभा सदस्य. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क अशा दोन खात्यांचा कार्यभार. नागपुरात सहाही आमदार भाजपचेच. महापालिकेत १० वर्षांपासून सत्ता याच पक्षाची. असे भाजपसाठी सर्वत्र अनुकूल आणि सुजलाम सुफलाम् वातावरण असतानाही उपराजधानीचे हे शहर स्वच्छतेच्या बाबतीत देशात तब्बल १३७व्या क्रमांकावर माघारणे ही साऱ्यांसाठीच लाजिरवाणी बाब ठरली आहे. भाजपासाठी ही जशी शोकांतिका आहे तसेच हे नागपुरातील नागरिकांचे अपयशही आहे. मध्यप्रदेशातील इंदूर हे शहर देशातील सर्वोच्च स्वच्छ शहर म्हणून बहुमान पटकावू शकते. इंदूरला जे जमले ते गडकरी, फडणवीसांच्या नागपूरला का नाही, असा प्रश्न यानिमित्ताने कुणी विचारला तर स्वाभाविकच ठरविला गेला पाहिजे. कमलेश वानखेडे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २०११-१२ मध्ये इंदूर ६१ व्या क्रमांकावर होते तर २०१४ मध्ये १४९ व्या क्रमांकावर घसरले होते. त्यामुळे या शहराला स्वच्छतेचा किताब मिळवून देणे तेवढे सोपे नव्हते. मात्र, तेथील महापौर मालिनी गौड, आयुक्त, नगरसेवक, अधिकारी, सफाई कर्मचारी व नागरिक यांनी आपापले कर्तव्य बजावले. स्वच्छतेला प्राधान्य दिले व इंदूरच्या शिरपेचात देशातील सर्वात स्वच्छ शहर होण्याचा मानाचा तुरा रोवला गेला. या यशाबाबत ‘लोकमत’ने इंदूरच्या महापौर मालिनी लक्ष्मणसिंह गौड यांच्याशी संपर्क साधला. गौड यांनी स्वच्छतेचा ’इंदूर पॅटर्न’ मांडत मनात आणले तर शहर स्वच्छ करणे कठीण नाही, असे इतर शहरांसाठी प्रेरणादायी ठरणारे मत व्यक्त केले. महापौर गौड म्हणाल्या, पूर्वी इंदूर शहरात दररोज ६०० ते ७०० टन कचरा उचलला जायचा. असे असले तरी सुमारे २०० टन कचरा रस्ते व कचऱ्या पेट्यांमध्ये पडून रहायचा. कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आलेली कंपनी ‘ए टू झेड’ चे काम समाधानकारक नसल्यामुळे सर्वप्रथम या कंपनीला हटविण्यात आले. महापालिकेने स्वत:ची यंत्रणा उभी केली. सुमारे १५०० अधिकारी- कर्मचाऱ्यांची नवी टीम तयार करण्यात आली. आमच्या शहराची सफाई आम्हालाच करू द्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत मिळालेल्या निधीतून कचरा उचलण्यासाठी ८५ गाड्या खरेदी केल्या. जुन्या डंपर गाड्यांची दुरुस्ती केली. घराघरातून कचरा उचलण्यास सुरुवात केली. विशेष स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यासाठी महापौर, आयुक्त, नगरसेवक यांची एक यंत्रणा उभारण्यात आली. यापैकी कुणालाही कुठे कचरा पडलेला आढळला तर त्यांनी महापालिका प्रशासनाला थेट वायरलेसवर माहिती कळवावी, अशी सोय करून देण्यात आली. यात नगरसेवकांनी चांगला पुढाकार घेतला. कचरा दिसताच तक्रारी होऊ लागल्या. आयुक्त मनीष सिंग यांचे परिश्रम व सहकार्य या कामी महत्त्वाचे राहिले. आपण स्वत:ही महापौर म्हणून बऱ्याचदा सकाळी शहराचा पाहणी दौरा केला. त्यामुळे प्रशासनालाही अलर्ट रहावे लागले. शेवटी सर्वांच्या सहकार्यातून शहर स्वच्छ झाले. रस्त्यांची धुलाई सुरू केली शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ, माती जमा व्हायची. सफाई केल्यानंतरही माती निघत नव्हती. त्यामुळे प्रमुख रस्त्यांची वेगवेगळ्या मशीन वापरून सफाई सुरू करण्यात आली. काही रस्ते रात्री धुण्यास सुरुवात केली. त्यामुळे रस्ते चकाचक दिसू लागले. होळकर यांच्या काळानंतर पहिल्यांदाच इंदूरमध्ये रस्ते धुण्याचा उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छ केलेल्या रस्त्यांवर पुन्हा कुणी कचरा फेकू नये म्हणून पथकाद्वारे पाळत ठेवण्यात आली. कारवाईमुळे कर्मचारी लागले सफाईला इंदूर महापालिकेत सुमारे सहा हजार सफाई कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांवर दररोजच्या सफाईची जबाबदारी होती. मात्र यापैकी सुमारे साडेचार हजार कर्मचारी प्रत्यक्षात सफाईचे कामच करीत नव्हते. आरोग्य निरीक्षक किंवा तत्सम अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून फक्त पगार घेत होते. महापालिका प्रशासनाने कडक कारवाई करीत ५०० सफाई कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले. यामुळे इतर कर्मचारी वठणीवर आले. नियमित सफाई करू लागले. जगजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घराघरातून कचरा उलण्यास सुरुवात केल्यानंतर या मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळणे आवश्यक होते. त्यामुळे जनजागृतीसाठी ४०० स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व सामाजिक संघटनांची मदत घेण्यात आली. याशिवाय स्वच्छतेचे महत्त्व, फायदे पटवून देणारे होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर शहरात लावण्यात आले. चित्रपटगृहांमध्ये याची जाहिरात करण्यात आली. सोशल मीडियाचीही मदत घेण्यात आली. कचरा गाड्यांवर सुरेल गाणी घरोघरी कचरा उचलण्यासाठी जाणाऱ्या गाड्यांवर लाऊड स्पीकर लावण्यात आले. त्यावर दररोज ‘स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने’ हे महापालिकेने तयार करून घेतलेले गाणे लावले जायचे. शहरात स्वच्छता अभियान राबविले जात असून सुजाण नागरिक म्हणून स्वच्छता राखणे ही आपलीही जबाबदारी आहे, याची जाणीव नागरिकांना करून देण्यात आली. या सकारात्मक परिणाम दिसून आला. नागरिकांनी उघड्यावर कचरा फेकणे बंद