मध्यरात्री चौकात दादागिरी, अगोदर दुचाकीला कट मारला व नंतर दुचाकीस्वाराला मारले

By योगेश पांडे | Updated: September 7, 2023 18:46 IST2023-09-07T18:46:49+5:302023-09-07T18:46:58+5:30

भर चौकात दादागिरी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

In the middle of the night, a bully, first slashed a two-wheeler and then killed the two-wheeler | मध्यरात्री चौकात दादागिरी, अगोदर दुचाकीला कट मारला व नंतर दुचाकीस्वाराला मारले

मध्यरात्री चौकात दादागिरी, अगोदर दुचाकीला कट मारला व नंतर दुचाकीस्वाराला मारले

नागपूर : भर चौकात दादागिरी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. आरोपींनी अगोदर एका दुचाकीला कट मारला व त्यानंतर जाब विचारणाऱ्या दोन तरुणांना बेदम मारहाण केली. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

अश्लेष सुनिल जलहालीकर (२२, कृष्णनिसर्ग अपार्टमेंट्स, राजीव नगर, हिंगणा रोड) व रोहीत वासुदेव शिंगणापुरे (२६, न्यू मंगलधाम सोसायटी, दत्तवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. बुधवारी मध्यरात्रीनंतर अक्षय ठोंबरे (२६, साईनगर) व तुषार चौधरी (२६, पिपळा फाटा) हे दोघे मित्र मोपेडने धरमपेठेत गेले होते. अक्षयच्या भावाला मुलगी झाल्याने ते तिला पहायला गेले होते. घरी परत जात असताना आरोपींनी मोरभवनसमोर त्यांच्या मोपेडला कट मारला. त्यामुळे अक्षयने त्यांना विचारणा केली. यावर संतापलेल्या आरोपींनी शिवीगाळ करायला सुरुवात केली व अक्षय-तुषारला मारहाण केली. आरोपींनी काचेच्या बॉटलने दोघांवरही वार केले. यात ते जखमी झाले. अक्षयने कशीबशी सुटका करत तेथून पळ काढला. पण आरोपी तुषारला मारहाण करतच होते. त्याचवेळी सिताबर्डी पोलीस ठाण्याचे गस्तीवरील पथक तेथे पोहोचले. त्यांनी अश्लेष व रोहीतला ताब्यात घेतले. तर अक्षय व तुषारला उपचारासाठी मेडिकल इस्पितळात घेऊन गेले. तुषारला तेथे दाखल करण्यात आले. अक्षयच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरोधात सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
 

Web Title: In the middle of the night, a bully, first slashed a two-wheeler and then killed the two-wheeler

टॅग्स :nagpurनागपूर