शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

शताब्दी वर्षात संघाकडून पंच परिवर्तन हेच कार्यसूत्र; उद्यापासून नागपुरात अ.भा.प्रतिनिधी सभा  

By योगेश पांडे | Published: March 13, 2024 7:42 PM

शुक्रवारपासून नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात होणार आहे.

नागपूर: शुक्रवारपासून नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात होणार आहे. संघाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होणार असून त्या दृष्टीने पुढील वर्षभर संघाकडून पंच परिवर्तन हेच कार्यसूत्र राहणार आहे. यात सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण आणि स्व-आधारित व्यवस्थेचा आग्रह आणि नागरी कर्तव्य यांचा समावेश असेल व यावर प्रतिनिधी सभेत मंथन होईल, अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी दिली. नागपुरात रेशीमबागेत आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

तीन दिवसीय प्रतिनिधी संमेलनाच्या प्रस्तावांवर गुरुवारी संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. पंचपरिवर्तन अंतर्गत सामाजिक परिवर्तनाचे काम केले जाणार आहे. देशाच्या राज्यघटनेलाही ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना त्यांच्या नागरी कर्तव्याची जाणीव करून दिली जाईल. प्रतिनिधी सभेच्या सुरुवातीला सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे हे गत काळात केलेल्या संघाच्या कार्याची माहिती देतील. तसेच आगामी योजनांवर चर्चा केली जाईल. सरसंघचालक आणि सरकार्यवाह यांच्या वर्षभराच्या प्रवासाचे वेळापत्रकही ठरविण्यात येणार आहे. प्रतिनिधी सभेच्या बैठकीत संघाच्या कार्याचा आणि विशेषत: संघ शाखांची संख्या एक लाखांहून अधिक करण्याच्या लक्ष्याचा आढावा घेतला जाईल. संघाच्या शताब्दी वर्षाच्या कृती आराखड्याबाबत विचारमंथनही होणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भडेसिया, सह-प्रचार प्रमुख नरेंद्र कुमार व आलोक कुमार उपस्थित होते.

भाजप अध्यक्ष येण्याची शक्यतासंघाच्या सभेला देशभरातून १५२९ प्रतिनिधी अपेक्षित आहेत. या बैठकीसाठी भाजपसह संघ परिवारातील ३६ संघटनांचे अध्यक्ष आणि संघटन प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. अशा स्थितीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाही नागपुरात येण्याची शक्यता आहे.

नागपुरात सहा वर्षांनंतर बैठकसंघातर्फे दरवर्षी अ.भा.प्रतिनिधी सभेचे आयोजन करण्यात येते. मात्र दर तीन वर्षांनी हे आयोजन मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या नागपुरात होते. २०१८ मध्ये नागपुरात सभा झाली होती. २०२१ मध्ये कोरोनामुळे आयोजन झाले नव्हते. अशा स्थिती सहा वर्षांनंतर प्रतिनिधी सभेचे रेशीमबागेत आयोजन करण्यात येत आहे.

अहिल्याबाईंचे त्रिशताब्दी वर्ष साजरे करणार२२ जानेवारीला अयोध्येत श्री रामलल्लाच्या अभिषेकने संपूर्ण देशात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही एक ऐतिहासिक घटना आहे.हे चांगले वातावरण निर्माण होण्याचे शुभ लक्षण आहे. या संदर्भातील प्रस्ताव प्रतिनिधी सभेत मांडण्यात येईल, असे आंबेकर यांनी सांगितले. अहिल्याबाई होळकर यांच्या त्रैशताब्दी वर्षानिमित्त संघातर्फे मे २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ