शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तरुण, तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेमसंबंध असल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 18:30 IST

आकाशने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच तरुणी त्याला पाहण्यासाठी त्याच्या घरी गेली. त्याचा मृतदेह पाहून ती आपल्या घरी आली व दुपट्याने गळफास लावून आत्महत्या केली.

सावनेर (नागपूर) : सावनेर शहरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किल्ला परिसरात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. त्याला फाशी लावलेल्या अवस्थेत पाहून बाजूलाच राहणाऱ्या तरुणीने घरी जाऊन गळफास घेत स्वत:चे जीवन संपवले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

सावनेरच्या माताखेडी किल्ला परिसरात आज (दि. १४) सकाळच्या सुमारास २२ वर्षीय आकाश प्रकाश लालबागे या तरुणाने घरात नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. वार्ता पसरताच हा प्रकार पाहण्यासाठी गर्दी जमू लागली. घटनेची माहीती मिळताच ठाणेदार मारुती मुळक आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह तसेच हितज्योती फाउंडेशनचे हितेश बंन्सोड हे त्यांच्या साथीदारांसह घटनास्थळी पोहचले व मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामा करुण मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर येथे रवाना केला.

वरील कारवाई सुरू असतानाच शेजारी तरुणीने ही गळफास घेतल्याची बातमी मिळाली. उपस्थितांनी तिच्या घराकडे धाव घेतली तिथे जाऊन पाहता तरुणीने दुप्पट्ट्याने  घेतल्याचे दृश्य दिसून आले. तरुणीला लगेच खाली उतरवून रुग्णालयात रवाना करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे माताखेडी परिसराचे वातावरण शोकाकुल होऊण  विविध प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आणि हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी जोडल्या जाऊ लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक आकाशने गळफास लावून आत्महत्या केल्याची बातमी मिळताच तरुणी त्याला पाहण्यासाठी त्याच्या घरी गेली आणि आकाशचा मृतदेह पाहून ती आपल्या घरी आली व दुपट्याने गळफास लावून आत्महत्या केली. दोन्ही घटनांची नोंद सावनेर पोलीस स्टेशनला करण्यात आली असून ठाणेदार मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शिवाजी नागवे, हेकाँ. विजय पांडे पुढील तपास करत आहेत.

सध्या या घटनेला प्रेमसंबंध जोडून बघितले जात असले तरी मात्र पुढील तपासात या घटनेची सत्यता समोर येईल, असे ठाणेदार मारुती मुळूक यांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूरPoliceपोलिस