लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :नागपूर महापालिका निवडणुकीत अपक्षांसह ३७ पक्षांचे ९९३ उमेदवार मैदानात होते. मनसेला २९ हजार ५१२, आम आदमी पार्टीला ६५ हजार ७१०, वंचित बहुजन आघाडीला ४० हजार ६, शिंदेसेनेला ६३ हजार १०१, उद्धवसेनेला ८९ हजार ९४२, तर राष्ट्रवादी (शरद पवार) ७५ हजार ६२३ मते मिळाली आहेत. या पक्षांच्या तुलनेत जास्त मते नागपूरकरांनी नोटाला दिली आहेत. नोटाला १ लाख २० हजार १५१ मते दिली आहेत.
२०१७ च्या मनपा निवडणुकीत ९४ हजार ८६५ नोटाला मते होती. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा नोटाला २५ हजार २८६ मते वाढली आहेत. २०१७ च्या मनपा निवडणुकीपेक्षा अपक्ष उमेदवारांना ६७हजार ८९१ मते अधिक मिळाली आहेत. निवडणुकीत मतविभाजनामुळेच एमआयएम ६ जागा, तर मुस्लीम लीग ४ जागा निवडून आल्या आहेत. या मतविभाजनाचा फटका काँग्रेस व बसपला बसला आहे.
नागपूर महापालिका निवडणुकीत भाजप १०२, काँग्रेसला ३४, एमआयएम ६, मुस्लीम लीग ४, उद्धवसेना २, शिंदेसेना १, राष्ट्रवादी (अजित पवार) व बसपला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. मनसे, वंचित, आपसह इतर छोट्या पक्षांना एकही जागा मिळालेली नाही. नागपूर महापालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग होता. त्यामुळे एक मतदाराला चार मते द्यायची होती. त्यामुळे या निवडणुकीत ५० लाख ९३ हजार ३५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्यात नोटाला १ लाख २० हजार १५१ मते मिळाली आहेत. उमेदवार पसंत नसलेल्या मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे. हे एकूण मतदानाच्या जवळपास २.३६ टक्के आहे.
नागपूर महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएमला सहा जागा मिळाल्या असून, या पक्षाच्या उमेदवारांना १ लाख १९ हजार १२३ मते मिळाली आहेत. तर, चार जागा जिंकणाऱ्या इंडियन युनियन मुस्लीम लीगला ३८ हजार १२० मते मिळाली आहेत.
अपक्ष उमेदवारांना २ लाख २२ हजार ८८६ मते
महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकीत १ अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. २०१७ च्या निवडणुकीत अपक्षांना १ लाख ५४ हजार २९५ मते मिळाली होती. आताच्या मनपा निवडणुकीत अपक्षांना २ लाख २२ हजार ८८६ मते मिळाली आहेत. ती २०१७मध्ये मिळालेल्या मतांपेक्षा अधिक आहेत.
प्रमुख पक्ष व नोटाला २०१७ व २०२६ मध्ये मिळालेली मतेभाजप १७,७४,०१८ २१,२३,७७८काँग्रेस १३, ५८,११३ १६,७२, ७४८बसप ४,०८,४४८ २,२५,१२३अपक्ष १,५४,९९५ २,२२,८८६नोटा ९४,८६५ १२०१५१
Web Summary : In Nagpur, MNS, AAP, and Vanchit received fewer votes than NOTA. BJP secured a significant victory. MIM and Muslim League gained seats due to vote division, impacting Congress and BSP. BJP won 102 seats.
Web Summary : नागपुर में, मनसे, आप और वंचित को नोटा से भी कम वोट मिले। भाजपा ने महत्वपूर्ण जीत हासिल की। वोट विभाजन के कारण एमआईएम और मुस्लिम लीग को सीटें मिलीं, जिससे कांग्रेस और बसपा प्रभावित हुए। भाजपा ने 102 सीटें जीतीं।