शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१४ महिन्यात रेल्वेचे १६ कोच ठरविण्यात आले बाद, २५ वर्षांच्या सेवेनंतर केले स्क्रॅप 

By नरेश डोंगरे | Updated: July 29, 2023 16:37 IST

स्क्रॅपच्या माध्यमातून पावणेदोन कोटींचे उत्पन्न

नरेश डोंगरे

नागपूर : कोट्यवधी प्रवाशांना तब्बल २५ वर्षे सेवा देणाऱ्या नागपूर विभागातील विविध मेल, एक्सप्रेसचे १६ कोच यंदा 'बाद' ठरविण्यात आले. त्यांना वेगळे करत रेल्वे प्रशासाने हे सर्व १६ कोच स्क्रॅपमध्ये काढले.

रोज हजारो प्रवाशांना बसवून त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रवासाच्या ठिकाणी नेऊन सोडणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये जे कोच (डबे) असतात. या प्रत्येक डब्याच्या सेवेचा कालावधी जास्तीत जास्त २५ वर्षे असतो. तथापि, वेळोवेळी प्रत्येक कोचचे सुक्ष्म निरीक्षण करून तो कोच प्रवाशी वाहतुकीसाठी योग्य आहे की नाही, हे तपासले जाते. जर तो कोच डॅमेज झाला असेल किंवा त्याची सेवा जास्तीत जास्त २५ वर्षे झाली असेल तर अशा कोचला निकामी ठरवून भंगारात काढले जाते. डब्यांना नष्ट करण्यासाठी किंवा त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी एक समिती नेमण्यात येते. रेल्वेच्या धोरणाअंतर्गत या डब्यांची पाहणी आणि उपयुक्तता संपल्याचा अहवाल ही समिती देत असते. ही समिती त्यांचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करते आणि नंतर बाद (निकामी) ठरविण्यात आलेल्या डब्यांना भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू होते.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एप्रिल २०२२ ते जून २०२३ या कालावधीत विविध मेल, एक्सप्रेसच्या १६ कोचला बाद ठरवून वेगळे करण्यात आले. त्यांना भंगारात काढून रेल्वे प्रशासनाने या १६ कोचच्या विक्रीतून १ कोटी, ७३ लाखांवर महसूल मिळवला.

वर्षभरात ११, तीन महिन्यांत ५ गेल्या वित्तीय वर्षांत अर्थात एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत ११ कोच बाद ठरविण्यात आले. त्यातून रेल्वेने १ कोटी, १९ लाख रुपये मिळवले तर गेल्या एप्रिल ते जून २०२३ या तीन महिन्यात ५ कोच बाद ठरवून त्याच्या विक्रीतून रेल्वेने ५४ लाख रुपये मिळवले.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर