नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती सुधारतेय  : कोरोना संशयितांचे १६ नमुने दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 11:30 PM2020-03-20T23:30:48+5:302020-03-20T23:32:19+5:30

कोरोना विषाणू पॉझिटिव्ह आलेले चारही रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. मेयोत भरती असलेल्या यातील एका रुग्णाच्या नमुन्याची दोनदा चाचणी करण्यात आली.

Improvement of the status of positive patients in Nagpur: 16 samples of Corona suspects filed | नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती सुधारतेय  : कोरोना संशयितांचे १६ नमुने दाखल

नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती सुधारतेय  : कोरोना संशयितांचे १६ नमुने दाखल

Next
ठळक मुद्देचाचणी निगेटिव्ह आल्यावरच बाधित रुग्णांना सुटी

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणू पॉझिटिव्ह आलेले चारही रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. मेयोत भरती असलेल्या यातील एका रुग्णाच्या नमुन्याची दोनदा चाचणी करण्यात आली. दोन्हीवेळा निगेटिव्ह आले तर मेडिकलमधील रुग्णांचे नमुने शुक्रवारी घेण्यात आले. लवकरच तपासणी केली जाणार आहे. मात्र, या चारही रुग्णांना भरती झाल्यापासून १४ दिवस रुग्णालयातच रहावे लागणार आहे. त्यानंतर दोन चाचणीत त्यांचे नमुने निगेटिव्ह आल्यावरच घरी पाठविले जाईल. मेयोच्या प्रयोगशाळेला आज १६ नमुने प्राप्त झाले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर व आरोग्य यंत्रणेकडून युद्धस्तरावर प्रयत्न केले जात आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तपासणीखाली आणले जात आहे. बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. यात लक्षणे आढळून येणाऱ्यांना मेयो, मेडिकलमध्ये दाखल केले जात आहे. ज्यांना लक्षणे नाहीत, ६० वर्षांखालील आहेत आणि जे नागपूरवासी आहेत त्यांना ‘कॉरन्टाईन’ कक्षातून सुटी दिली जात आहे. घरीच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. या शिवाय, जे संशयित रुग्ण आहेत आणि घरी आहेत त्यांना दिवसा व रात्री फोन करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली जात आहे. यात कुणाला लक्षणे दिसल्यास त्यांना मेयो, मेडिकलमध्ये दाखल केले जात आहे. या स्वरुपात शासनाचे काम सुरू आहे. बहुसंख्य नागरिकही प्रतिबंधात्मक उपचार करीत आहे. यातच कोरोना विषाणूची लागण झालेल्या चारही रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे. यामुळे नागपुरात एक सकारात्मक चित्र निर्माण होऊ लागले आहे.
शुक्रवारी मेयोमध्ये कोरोनाचे तीन तर मेडिकलमध्ये एक संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. आज पहिल्या टप्प्यात केलेल्या पाच संशयित रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात १६ नमुने तपासणीसाठी आले असून रात्री उशिरापर्यंत याचा अहवाल येण्याची शक्यता आहे.
अमरावतील सहा तर गोंदियातील दोन नमुने
मेयोच्या प्रयोगशाळेला आज १६ नमुने प्राप्त झाले. यात मेयोतील सहा, अकोल्यातील एक, भंडाºयातील एक, अमरावतीतील सहा तर गोंदियातील दोन नमुन्यांचा समावेश आहे.
१४ प्रवाशांची विलगीकरण कक्षात रवानगी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या १४ प्रवाशांच्या तपासणीनंतर सर्वांनाच आमदार निवासातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. यातील एका प्रवाशाला लक्षण आढळून आल्याने मेयोमध्ये पाठविण्यात आले.

Web Title: Improvement of the status of positive patients in Nagpur: 16 samples of Corona suspects filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.