लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील प्रसिद्ध औद्योगिक संस्था आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई अॅडव्हान्सचा निकाल शुक्रवारी घोषित झाला. यावर्षी निकालात नागपूर विभागाची रँकींग सुधारली असून, ऑल इंडिया स्तरावर नागपूर विभागातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे जेईई मेन्सपेक्षा अॅडव्हान्सचा निकाल आणखी चांगला लागला आहे. विद्यार्थ्यांचे आयआयटी मध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न त्यामुळे साकार झाले आहे.शुक्रवारी घोषित झालेल्या निकालात देशात टॉप करणाऱ्यांमध्ये चंद्रपूरच्या कार्तिक गुप्ता याचा समावेश आहे. जेईई मेन्समध्ये त्याने ऑल इंडिया लेव्हलवर १८ रॅँक मिळविली होती. कार्तिक बरोबरच दिव्यांग प्रवर्गात वेदांत बोरकुटे हा जेईई अॅडव्हान्समध्ये ऑल इंडिया लेव्हलवर प्रथम आला आहे. त्याचबरोबर आयकॅडचा विद्यार्थी असलेला नागपूरच्या वेदांत साबू यानेसुद्धा ऑल इंडिया लेव्हलवर १४७ वा क्रमांक मिळविला आहे. तर अभिषेक गांधी हा २७७ क्रमांक आहे. चिन्मय रत्नपारखी ३६७, कृष्णा भट्टड याने ८५० ऑल इंडिया स्तरावर रॅँक मिळविली आहे. तर ओबीसी प्रवर्गात अथर्व वऱ्हाडे याने १४५ वी रँक मिळविली आहे. आयआयटी रुडकीद्वारे घेण्यात येणाऱ्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेत नागपूर विभागातून ११८० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार १५८ विद्यार्थी आयआयटीमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरले आहे.
जेईई अॅडव्हान्समध्ये नागपूर विभागाची रँकींग सुधारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 23:05 IST
देशातील प्रसिद्ध औद्योगिक संस्था आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई अॅडव्हान्सचा निकाल शुक्रवारी घोषित झाला. यावर्षी निकालात नागपूर विभागाची रँकींग सुधारली असून, ऑल इंडिया स्तरावर नागपूर विभागातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे जेईई मेन्सपेक्षा अॅडव्हान्सचा निकाल आणखी चांगला लागला आहे. विद्यार्थ्यांचे आयआयटी मध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न त्यामुळे साकार झाले आहे.
जेईई अॅडव्हान्समध्ये नागपूर विभागाची रँकींग सुधारली
ठळक मुद्दे देशात टॉप करणाऱ्यांमध्ये चंद्रपूरच्या कार्तिक गुप्ता याचा समावेश