शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

भाजपकडून पारंपारिक जाहीरनाम्याऐवजी अंमलबजावणी आराखडा घोषित

By योगेश पांडे | Updated: October 15, 2024 17:12 IST

Nagpur : सोशल माध्यमांवर नागरिकांकडून मागविणार सूचना

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :विधानसभा निवडणूकीची घोषणा झाल्यावर सर्वच पक्षांकडून जाहीरनामा कधी प्रसिद्ध करण्यात येतो याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. भारतीय जनता पक्षाने दरवेळेसारखा पारंपारिक जाहीरनामा प्रसिद्ध करण्याऐवजी अंमलबजावणी आराखडा घोषित करण्याचे ठरविले आहे. यासाठी भाजपची मोठी चमू कामाला लागली असून सोशल माध्यमांवर नागरिकांकडून सूचनादेखील मागविण्यात येणार आहेत.

पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य खा.धनंजय महाडिक यांना नागपुरात मंगळवारी पत्रपरिषदेदरम्यान ही माहिती दिली. विधानसभा निवडणूक जाहीरनाम्याची भाजपची तयारी अंतिम टप्प्यात आली असून पक्षाने त्याचे स्वरुप ‘अंमलबजावणी आराखडा’ करण्याचे निश्चित केले आहे. पारंपरिक जाहीरनाम्याच्या पुढे जात जाहीरनाम्याची अंमलबजावणी केली जाईल. परंपरागत जाहीरनाम्यात केवळ आश्वासने दिली जातात. मात्र सत्तेत पुन्हा येण्यासाठी संकल्पातून जाहीरनामा करण्याचा आणि त्याची अंमलबाजवणी करण्याचा आराखडा भाजपकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी तीस सदस्यांची जाहीरनामा समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती खा.महाडिक यांनी दिली. जनतेकडून इन्स्टाग्राम, फेसबुक, ई-मेल, पत्र इत्यादींच्या माध्यमातून सूचना मागविण्यात आल्या असून त्यांचा या आराखड्यात अंतर्भाव करण्यात येईल, असा दावा मंक यांनी केला. जाहीरनामा समितीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्यासह डाॅ. विनय सहस्त्रबुद्धे, माधव भंडारी, ॲड. उज्ज्वल निकम, डाॅ. भारती पवार, सुभाष देशमुख, माधवी नाईक, दिलीप कांबळे, धनंजय महाडिक, संभाजी निलंगेकर, धनंजय मंगरूळे, केशव उपाध्ये, अनिल सोले, नरेंद्र पवार यांचा समावेश आहे. पत्रपरिषदेला भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे, अश्विनी जिचकार तसेच प्रदेश प्रवक्ते चंदन गोस्वामी उपस्थित होते.

१८ विषयांवर आधारित असेल आराखडाभाजपने या अंमलबजावणी आराखड्याच्या दृष्टीने १८ विविध विषयांची निवड करत तितक्याच उपसमित्यादेखील स्थापन केल्या आहेत. यात कायदा व सुव्यवस्था, मदत आणि पुनर्वसन, शेती, महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण, सामाजिक न्याय, शिक्षण, ज्येष्ठ नागरिक, वनक्षेत्र, पायाभूत सुविधा, पर्यटन, भाषा व संस्कृती, शहरी विकास, ग्रामविकास, पशुसंवर्धन इत्यादी विषयांचा समावेश आहे.

टॅग्स :BJPभाजपाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024