त्रिमूर्तीनगर मटन मार्केटचे अतिक्रमण तत्काळ हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:54 IST2021-02-05T04:54:15+5:302021-02-05T04:54:15+5:30
महापौरांचे निर्देश : नागरिकांच्या तक्रारीनंतर आढावा बैठक लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : त्रिमूर्तीनगर येथील नाल्यालगत असलेल्या जागेवर मटन ...

त्रिमूर्तीनगर मटन मार्केटचे अतिक्रमण तत्काळ हटवा
महापौरांचे निर्देश : नागरिकांच्या तक्रारीनंतर आढावा बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : त्रिमूर्तीनगर येथील नाल्यालगत असलेल्या जागेवर मटन विक्रेत्यांनी अतिक्रमण करून मटन मार्केट थाटले आहे. त्यामुळे होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त असल्याने मटन मार्केट येथील मटन व चिकन मार्केटच्या अतिक्रमणाचे ओटे व शेड तीन दिवसांत हटवून या ठिकाणी इमारतीचा मलबा टाकण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी लक्ष्मीनगर झोन येथील बैठकीत दिले.
द्रोणाचार्यनगर आणि सरस्वती विहार येथील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी महापौरांना निवेदन दिले होते. महापालिका प्रशासनाने मटन मार्केटचे अतिक्रमण हटवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार येथील मटन मार्केटमधील अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच झोनमध्ये संध्याकाळी ६ ते ८ व सकाळी कारवाई करून रस्त्यावरच्या अतिक्रमणकर्त्यांचे साहित्य जप्त करावे, असे आदेश महापौरांनी या वेळी दिले.
या वेळी झोन सभापती प्रकाश भोयर, शिक्षण सभापती दिलीप दिवे, प्रमोद तभाने, नंदाताई जिचकार, सोनालीताई कडू, सहायक आयुक्त गणेश राठोड, आरोग्य विभागाचे झोनल अधिकारी रामभाऊ तिडके, कार्यकारी अभियंता विजय गुरबक्षाणी आदी उपस्थित होते.