शेतकरी आत्महत्या प्रकरणात तात्काळ मदत करा : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 09:45 PM2019-08-29T21:45:57+5:302019-08-29T21:47:20+5:30

कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना तात्काळ मदत देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या.

Immediate Assistance in Farmer Suicide Case: Collector Ashwin Mudgal | शेतकरी आत्महत्या प्रकरणात तात्काळ मदत करा : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

शेतकरी आत्महत्या प्रकरणात तात्काळ मदत करा : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

Next
ठळक मुद्देप्रकरणांचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना तात्काळ मदत देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या.
बचत भवन सभागृहात जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी निर्देश दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी कमलकिशोर फुटाणे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, पोलीस, कृषी, सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शेतकरी आत्महत्यासंदर्भात १६ प्रकरणे जिल्हा निवड समितीसमोर प्राप्त झाली आहेत. त्यासंदर्भात संपूर्ण अहवाल येत्या १० सप्टेंबरपर्यंत जिल्हा निवड समितीसमोर ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.
काटोल तालुक्यातील दिग्रस बु. येथील विजय जयसिंग ढवळे, या ३५ वर्षीय शेतकऱ्याने युनियन बँकेच्या काटोल शाखेतून २०१६ मध्ये १ लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. ते थकीत असल्यामुळे आणि शेतातील नापिकीमुळे तो कर्जाची परतफेड करू शकला नाही तसेच घरखर्चासाठी सुमारे पाच लाख रुपयांचे कर्ज होते. संबंधित शेतकऱ्याच्या वारसांना तात्काळ मदत देण्यासंदर्भातही यावेळी निर्देश देण्यात आले.
या बैठकीला समितीतील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा उपनिबंधक, पोलीस उपायुक्त, कृषी सभापती, पंचायत समिती सदस्य आणि उपविभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Immediate Assistance in Farmer Suicide Case: Collector Ashwin Mudgal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.